ACCIDENT : माळशेज महामार्गावर अपघात; दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू -Kishor Gaikwad


ACCIDENT : माळशेज महामार्गावर अपघात; दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. २०) : (किशोर गायकवाड) माळशेज घाट फिरायला गेलेल्या सांताक्रूझ येथील तरुण-तरुणीचा दुचाकी आणि बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची चित्तथरारक घटना घडली असून दोघांचे शव मुरबाड शहराच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.




 प्राप्त माहितीवरून, रोहित रमेश डिंगणकर (वय २४ वर्षे) व नंदिनी मयांगडे (वय २३ वर्षे) अशी मृतकांची नावे असून दोघेही सांताक्रूझ येथील रहिवासी होते. पावसाळ्यात दुचाकीवर (एमएच ०२ एफपी ४७४६) माळशेज घाट भ्रमंती करायला आलेल्या या तरुण-तरुणीचा परतीच्या प्रवासा दरम्यान दुपारच्या सुमारास नाणेघाट जवळ राष्ट्रीय महामार्ग ६१ वर अहमदनगर मार्गे जाणाऱ्या तारकपूर आगाराच्या बसला (एमएच १४ केए ९८४५) धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार तरुण व तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचे शव टोकावडे पोलिसांनी मुरबाड शहरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे.



 या अपघाताची तीव्रता इतकी अधिक होती की, हेल्मेट मृत दुचाकी चालकाच्या डोक्यात अडकून होता. तसेच त्याच्या डोळ्याला व छातीला मार असून पोटाचा अंतर्भाग बाहेर निघाल्याचे दिसून आले. तर बसच्या पुढील भागाचे आवरण निखळून पडले असून दुचाकी चक्क होत्याची नव्हती झाली आहे. याप्रकरणी बस चालक संजय पवार व वाहक उषा मुंडलिक यांना चौकशी कामी टोकावडे पोलिस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास टोकावडे पोलिस करीत आहेत.



  पावसाळ्यात मुरबाड - माळशेज महामार्गावर अनेक अपघातांच्या घटना कानावर येत असतात. त्यामुळे पावसाळ्यात हा राष्ट्रीय महामार्ग प्रवासासाठी सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे. याच माळशेज घाटात काचेचा पूल बनविण्याचा मनसुबा असल्याचे अनेक वर्षांपासून केवळ आणि केवळ ऐकिवातच आहे. परंतु सद्यस्थितीला काचेच्या पुला ऐवजी या महामार्गावर सुरक्षित प्रवासाची हमीच अपेक्षित असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...




































Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments