स्पष्टच! 'मुरबाड रेल्वे हा निव्वळ गाजर; लोकसभेच्या निवडणूकी पुरता, फसवणूकीचा मुद्दा आहे' - बाळ्यामामा म्हात्रे [Kishor K Gaikwad]

NCP Press Conference on Murbad Railway


स्पष्टच! 'मुरबाड रेल्वे हा निव्वळ गाजर; लोकसभेच्या निवडणूकी पुरता, फसवणूकीचा मुद्दा आहे' - बाळ्यामामा म्हात्रे

[Kishor K Gaikwad]

ठाणे/मुरबाड (दि. ३) : (किशोर गायकवाड) मुरबाड रेल्वे बाबत अद्यापही संभ्रम असून याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय? यावर भाष्य करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुरबाडमध्ये आंदोलन व पत्रकार परिषद आयोजित केली होती.






  मुख्यत्वे मुरबाड रेल्वे संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती देण्यासाठी आज मुरबाड शहरातील शासकीय शिवनेरी विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (Nationalist Congress Sharadchandra Pawar Party) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा संभाव्य उमेदवार तथा लोकसभा प्रभारी सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे उपस्थित होते.

 

Murbad Railway Inauguration 2019


  सरकारच्या निषेधार्थ मुरबाड शहरातील (Murbad City) तीन हात नका येथे गाजर व चॉकलेट वाटप केल्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यात आली. आजच्या दिवशी खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या माध्यमातून तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दि. ३ मार्च २०१९ रोजी रेल्वेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. या उद्घाटनाला आज ५ वर्षे पूर्ण झाल्याने जनतेला आठवण करून देण्यासाठी सदरची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.



मुरबाड येथे बाळ्यामामाची पत्रकार परिषद

  • यावेळी बाळ्यामामा यांनी पत्रकारांशी बोलतांना खासदार कपिल पाटील यांच्या १० वर्षीय संसदीय कारकिर्दीवर टिकांचा भडिमार केला. "खासदार कपिल पाटील हे निव्वळ आश्वासनाचा पाऊस पाडत आहे. गेल्या १० वर्षांपासून इतर लोकांच्या कामावर ऐन वेळी डल्ला मारून श्रेय लाटण्याने काम खासदार पाटील हे करत आहेत. मंत्री पद असताना देखील कुठल्याही प्रकारची मंजुरी आणली नाही. एकही प्रोजेक्ट पाटील यांनी आणला नाही.

  •  मुरबाड रेल्वे ही एक रेल्वे नसून तो मुरबाडच्या जनतेसाठी गाजर आहे. भिवंडी लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपकडून मुरबाड रेल्वेला पुढे केले जात आहे. मुरबाड रेल्वेसाठी अंदाजे पंधराशे कोटींची आवश्यकता असतांना १० कोटीच मंजूर सांगितले जात आहे. मुरबाड तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग २२२ अजूनही रुंदीकरण झालेला नाही.

  • खासदार पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत एक देखील बिल पारित केले नाही. पाटील खासदार असून खासदाराची कामे देखील त्यांना कळाली नाहीत. त्यामुळे पाटील हे सपशेल अपयशी ठरलेले खासदार असून आमची लढाई ही अपयशी खासदाराच्या विरोधातील लढाई आहे. 


  •  दिनांक १० जानेवारी रोजी कल्याण येथे आगरी कोळी कुणबी संस्कृतीक भवनसाठी ७ कोटी रुपये कपिल पाटील यांनी मंजूर केल्याचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र हे खोटे असून याबाबत अधिकारी वर्गाने निधी मंजूर नसल्याचे दिलेले पत्र व फोटो बाळ्यामामा यांनी पत्रकार परिषदे समोर ठेवले.
  •  तालुक्यातील शाही धरण हे ५४ गावांचा विषय असून ग्रामस्थांच्या मागण्यांचा देखील विचार झालेला नाही. मुरबाड एमआयडीसी (MIDC) अर्धी बंद असून रोजगाराचा गंभीर प्रश्न देखील प्रलंबित आहे. त्यामुळे खासदार कपिल पाटील यांचा निषेध केला तेवढा कमीच आहे."

असा टिकांचा पाढा बाळ्यामामा म्हात्रे यांनी पत्रकारां समोर वाचला. तर भिवंडी लोकसभेसाठी मविआचे जेष्ठ नेते जो उमेदवार निवडतील त्याच्या सोबत तन मन धनाने काम करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर खासदार कपिल पाटील यांना येत्या लोकसभेत पराजित करण्यासाठी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे (Nilesh Sambare) व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे (Dayanand Choraghe) यांचे सोबत बैठक देखील झाल्याचा गौप्यस्फोट बाळ्यामामा यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे व तालुका कार्याध्यक्ष विलास भावार्थे, निलेश शिंदे, शहराध्यक्ष तेजस व्यापारी, शहर युवाध्यक्ष अभिषेक डुंकवाल व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

बाळ्यामामा म्हात्रे

तर विरोधकांच्या या टीकास्त्रला खासदार कपिल पाटील हे कशा पद्धतीने उत्तर देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 -किशोर गायकवाड


वाचा...





भाग - २ | शेतकरी सहकारी संघाच्या भात खरेदी पसाऱ्याने घेतला वळण... सविस्तर : नवीन भाताची 'या' ठिकाणी व्यवस्था; वाचा, शेतकऱ्यांची व्यथा! [KISHOR GAIKWAD]

भाग - १ | भात खरेदीचा धान्य पसारा रस्त्याच्या कडेला... वाचा : 'या' कारणामुळे भात चोरीला जाण्याची शक्यता? [KISHOR GAIKWAD]

आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]

सामाजिक ऐक्य : ढोल ताशांचा गजर अन् कव्वालीचा स्वर; वांजळे गावच्या उर्समध्ये घुमतो एकोप्याचा नांद..! [ Kishor Gaikwad ]



Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments