भिवंडी लोकसभा बिग अपडेट्स : आघाडीत बिघाडी; बाळ्यामामा विरुद्ध चोरघे अन् कपिल रथाचा मार्ग सुखकर?
Kishor K Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. ४) : (किशोर गायकवाड) लोकसभेच्या रणसंग्रामाने सध्या भिवंडी मतदारसंघात चांगलाच वेग धरला असून विश्लेषकांचे अंदाज चुकविणारे रोजच नवनवीन राजकीय अपडेट्स सोशियल मीडिया द्वारे समोर येत आहेत.
![]() |
List of Loksabha Candidates.of NCP |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची (Rashtrawadi Congress Party Sharadchandra Pawar) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता काल दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात २३- भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे [Suresh (Balyamama) Mhatre] यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे. या उमेदवारीने मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जरी जल्लोषाचे वातावरण असले तरी कोंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
![]() |
या उमेदवारीची घोषणा जाहीर होताच काल (दि. ४) सायंकाळी उशिरा सोशियल मीडियावर ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे (Dayanand Chorghe) यांच्या नावानिशी कोंग्रेस कार्यकर्त्याकडून सोशियल मीडियावर एक टंकलिखित फतवा व्हायरल करण्यात आला आहे. यात काँग्रेस पक्षाच्या सर्व विंग्सच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे की वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त होईपर्यंत कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊ नये, त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील (Bhiwandi Loksabha Constituency) महाविकास आघाडीतील बिघाडीवर मलमपट्टी होईपर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह पक्षांचा मतदार वर्ग मोठ्या संभ्रमात सापडला आहे.
![]() |
Kapil Patil with Appasaheb Dharmadhikari |
दुसरीकडे या सुवर्णसंधीचा लाभ घेत कपिल पाटील (Kapil Patil) टीम अत्यंत सावध व पद्धतशीरपणे कामाला लागली आहे. नुकतीच कपिल पाटील यांनी आपल्या विश्वासू सहकार्यां सोबत अप्पासाहेब धर्माधिकारी यांची आशीर्वादरुपी भेट घेतल्याचे फोटो सोशियल मीडिया व वृत्तांमध्ये प्रसिध्द झाले आहेत. शिवाय पाटील यांचे कार्यकर्ते जीव ओतून निवडणुकीच्या तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत. अशात भाजपचा सुपडा साफ करण्याचा एकजुटीने संकल्प केलेल्या महाविकास आघाडीची भिवंडी मतदारसंघात पुरता तोडमोड झालेली पाहायला मिळत आहेत.
भिवंडी लोकसभा काँग्रेसचा मतदारसंघ राहिला असला तरी मागील दोन्ही पंचवार्षिकमध्ये कोंग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. यास उमेदवारानी छुपी हातमिळवणी केल्याच्या स्टेटमेंट ऑफ द कॅमेरा देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. मागील निवडणुकीत काँगेस उमेदवार सुरेश टावरे (Suresh Taware) हे अचानकपणे प्रचार प्रक्रियेतून नॉटरीचेबल झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र यावेळी ही काही वेगळे चित्र नसल्याची टीका विरोधकांकडून ओरबाडली जात आहे. असे असतांना अथक प्रयत्नां नंतर राष्ट्रवादीच्या बाळ्यामामा यांच्या गळ्यात पडलेली उमेदवारीची माळ हिसकावू पाहणाऱ्या कोंग्रेसकडून पुन्हा याच जागेसाठी हट्टहास केला जात आहे.
![]() |
Kapil Patil V/S Balyamama |
-Kishor K. Gaikwad
(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)
0 Comments