शॉकिंग न्युज : मुरबाड MIDC मधील कारखान्यावर एकाचवेळी MSEDCL आणि महसूल विभागाचा छापा..! [KISHOR K GAIKWAD]



शॉकिंग न्युज : मुरबाड MIDC मधील कारखान्यावर एकाचवेळी MSEDCL आणि महसूल विभागाचा छापा..!


[KISHOR K GAIKWAD]

ठाणे/मुरबाड (दि. ३) : (किशोर गायकवाड) मुरबाड अतिरिक्त एमआयडीसी (MIDC Murbad) मधील एका कारखान्यावर काल बुधवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास एकाचवेळी विद्युत वितरण कंपनीकडून व महसूल विभागाकडून मोठी छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.


MIDC Murbad Plot no. L-5


  प्राप्त माहिती वरून, मुरबाड अतिरिक्त एमआयडीसी (MIDC) मधील प्लॉट नं. एल-५ (L-5) च्या जे. इ. सी. एल. इंजिनिअरिंग लिमिटेड नामक कारखान्यामध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असताना कारखान्या अंतर्गत स्वामित्व धन अदा केल्या विना खडी, बारीक गिरीट वापरून सिमेंट रस्त्याचे व डबरचे बांधकाम काम करण्यात आले आहे. तसेच सदर कारखाना वीज देखील चोरून वापरत असल्याची माहिती प्राप्त होताच एकाचवेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व महसूल अधिकारी यांचेकडून मोठी छापेमारी करून पंचनामा करण्यात आला आहे.



  यात वीज वितरण कंपनी (MSEDCL Murbad) यांनी १ लाख ६६ हजार रुपये दंड ठोठावला असून महसूल अधिकारी यांचा पंचनामा टपालात सादर करण्यात आला आहे. त्यावर दंडात्मक कारवाईची रक्कम जोडणी प्रक्रिया सुरू आहे.  त्यामुळे शासनाला लाखों रुपयांचा गंडा घालणाऱ्या कंपनी मालका विरोधात संताप व्यक्त केला जात असून याप्रकरणी बारकाईने चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. मात्र याखेरीज सदर प्रकरणात आर्थिक तडजोड होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व महसूल विभाग दोषी कंपनी मालकाकडून किती आणि कधीपर्यंत दंड वसूल करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


MSEDCL Office Murbad

तर कारखाना प्रशासनाने वीज चोरीच्या आरोपाचे खंडन केले असून भरलेली विजबिले उपलब्ध असल्याचे बोलत आहेत. तसेच कारखान्या अंतर्गत सुरू असलेले काम हे जुन्याच रस्त्यावर सुरू असून पूर्णपणे कायदेशीर असल्याचे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.


  
"अशा वीज चोऱ्या मुरबाड एमआयडीसीमध्ये सर्रास सुरू आहेत. मुरबाड तालुक्यात दरदिनी हजारो युनिट विजेची चोरी होत असते. तालुक्यात हजारो बेकायदेशीर डबर खदानी मुरबाड तहसीलदारांच्या छुप्या आशिर्वादाने सुरू आहेत. याबाबत वीज वितरण कंपनी व महसूल विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र पथके स्थापन करून तालुक्यात छापेमारी करून वीज चोरटे व गौणखनिज माफियांवर कारवाईचा बगडा उभारला पाहिजे, अशी मागणी आमच्या पक्षाची आहे. मात्र कसूर झाल्यास याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू."

 -रविंद्र लहुजी चंदने

रिपाइं सेक्युलर ठाणे जिल्हाध्यक्ष






-Kishor K. Gaikwad


Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments