Bhiwandi Loksabha : कुंपणचं खातंय शेत? भाजपा विरोधी जाळे विणणारे कोळीच आता जाळ्यात? कथोरेंच्या भूमिकेवर संशोधन सुरू? हकालपट्टीचा फर्मान केव्हाही मार्गस्थ? वाचा लोकसभे दरम्यानच्या आतील गुपित कहाण्या...
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) लोकसभेची चाहूल सुरू होताच निवडणूकीच्या पूर्वार्धात विविध हौसे नवसे नेते-अभिनेते भिवंडी मतदारसंघातून उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी उतावीळ झाले होते. असेच घुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांना गळ घालून पक्ष श्रेष्ठींकडून तिकिटाची शिदोरी घेऊन येण्यासाठी मुरबाड-बदलापूरच्या 'विकासाचे वारे' यांनी लोभीत करून संपूर्ण निवडणूकिच्या कामा समवेत विजयाची हमी दिल्याची खात्रीयुक्त गॉसिप आहे. तर यातून आमिषाला बळी पडलेल्यांनी मुरबाडच्या विधानसभेकडे विश्वास देखील टाकला; परंतु, ऐनवेळी हे वारे नेमके कोणाच्या दिशेने वाहिले? याचा अंदाज मात्र कळू शकला नाही. सबब, घोर तथा शुद्ध फसवणूक झालेले विविध पक्षीय उमेदवार यांच्या चेहऱ्यावरील रंगछटा सध्या उडल्याच्या चर्चा आहेत.
लोकसभेच्या रणसंग्रामात भाजपा उमेदवार कपिल पाटील यांचेसह अन्य चर्चित असलेल्या दोन्ही उमेदवारांना मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांनी चक्क हातोहात गंडवल्याची सावध चर्चा आहे. सर्वच उमेदवारांच्या दोऱ्या-जबाबदाऱ्या हातात घेऊन कथोरे यांनी अत्यंत गुप्तता बाळगत लोकसभेच्या संमिश्र कामाला सुरुवात तर केली, मात्र पाण्यात विसर्जित केलेल्या मलासारखा कथोरे यांचा फजिलपणा मतदानाच्या पूर्वेसंध्येलाच तरंगून सर्वांन समोर उघडा पडल्याची बोंब आहे.
सुरुवातीला तिकटासाठी धडपड करीत असलेल्या अन्य पक्षीय इच्छुक उमेदवारांना आपण सोबत असल्याचे आश्वासित करून आपल्याच पक्षाच्या उमेदवारा समोर लोकसभा मैदानात उतरविण्यासाठी तयार केल्याच्या गंभीर आरोपाखाली असलेले आमदार किसन कथोरे यांचे कार्यकर्ते, समर्थक यांना मोबदल्यात तूर्तास चोप दिल्याच्या जोर धरत असलेल्या अदृश्य वार्ता पुराव्याची साक्ष देत आहेत.
मतदान दिनी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील (Murbad Assembly) कुणबी बहुल गावांमध्ये अपक्ष उमेदवाराच्या शिलाई मशीनला तर इतर ठिकाणी बाळ्यामामांच्या तुतारीला मतदानासाठी कथोरे गटाकडून प्रयत्न करण्यात आल्याचे यातून समजले आहे. एकंदरीत पाहता, भाजपा उमेदवाराला लाखभर मतांची लीड मुरबाड तालुक्यातून देण्याचे खुद्द उपमु़ख्यमंत्र्यां समक्ष जाहिर केल्यानंतर मातृ पक्षा सह अपोजिटचे मविआ व अपक्ष उमेदवाराला देखील फसविण्याचा कुटील प्रयोग कथोरेंनी केला, असे म्हंटले जात आहे. तथापि, या क्लुप्तीने काही विशेष फरक पडला नसल्याचे बोलले जात असून उलटपक्षी कथोरेंच्या सोबत विरोधी काम करणाऱ्या समर्थकांना कपिल पाटिल (Kapil Patil) समर्थकांकडून अनेक ठिकाणी शेकविल्याची जोरदार चर्चा होत आहेत. शिवाय यास हवाला देण्यासाठी मुरबाड परिक्षेत्राचा सोशियल मीडिया फ्लॅटफॉर्म काही ऑडिओ क्लिपनी सुध्दा दणाणून उठला आहे.
मात्र लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाडात घडलेल्या राजकीय चकमकीची इत्यंभूत खबर भाजपा पक्षश्रेष्ठीं पर्यंत पोहचल्याचे ऐकिवात असून कुंपणानेच शेत खाल्ल्याने येत्या ४ जून नंतर हकालपट्टीचा फर्मान कधीही येऊन धडकेल? असा गौप्यस्फोट चर्चिला जात आहे. तर संशयाच्या भोवऱ्यात असलेले मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार किसन कथोरे साहेब यातून कशा पद्धतीने मार्ग काढतात? यावर अनेकांचे लक्ष केंद्रित आहे. (क्रमशः...)
0 Comments