मुरबाड : आणखीन तीन गावे कंटेन्मेंट झोनमध्ये..! ( किशोर गायकवाड )


Containment zone Murbad
Containment Zone Murbadमुरबाड
: (दि. २७) मुरबाड शहरासह तालुक्यातील एकूण ७ गावांचे परिसर सद्या प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र आज यात दोन गावांची भर पडणार आहे. 

  मुरबाड तालुक्यातील नारीवली, माल्हेड व सायले गाव आजपासून रहदारीसाठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. नारीवली गावातील ५६ वर्षीय राजकीय पदाधिकारी कोरोनाने संक्रमित झाल्याचे समजले आहे. सदर व्यक्तीचा संपर्क दांडगा असल्याने आपल्या राजकीय कामकाजा दरम्यान त्यांचा अनेकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे ही लागण कुठे झाली असावी? नेमकं सांगणं अवघड असल्याचे बोलले जात असून यामुळे गाव प्रतिबंधित करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना होम कोरोन्टाईन करण्यात आले आहे.

  तसेच तालुक्यातील माल्हेड गावच्या ५१ वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट ही काल पॉझिटिव्ह आले असून सदर गाव प्रतिबंधित करण्यात आला आहे. सदर व्यक्ती हा बदलापूर येथील बँकचा कर्मचारी आपल्या माल्हेड गावातील घराच्या दुरुस्तीसाठी मुरबाड येथे आल्याचे समजते.
  
  सायले गावातील ४७ वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट ही काल पॉझिटिव्ह निघाले आहेत. सदर व्यक्ती हा मुरबाड तालुक्याच्या बाहेर राहत असल्याचे समजते.

  तालुक्यातील नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना ठाणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

[ मुरबाड|आतापर्यंतचा कोरोना प्रवास सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करा ]  आज नवीन काही स्वॅब टेस्टिंगला जाणार असून मागील पेंडिंगला असलेले रिपोर्ट दिवसभरा दरम्यान समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील होम कोरोन्टाईन व्यक्तींचा आकडा ५०० वर जाऊन पोहचण्याची शक्यता आहे.

   तालुक्याबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची अवस्था ऐकल्या नंतर आता मुरबाडमध्ये स्वतंत्र कॉविड सेंटरची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत उच्च स्तरावरून लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.

प्रतिबंधित क्षेत्र:-
 • कोंडेसाखरे
 • सोनारपाडा (शहर)
 • हनुमान आळी (शहर)
 • पोलीस वसाहत (शहर)
 • अस्कोत
 • शिरगाव
 • मडके पाडा
 • कासगाव
 • माळीपाडा
 • वैशाखरे
 • नारीवली
 • माल्हेड

आतापर्यंत पॉझिटिव्ह संख्या = ३२


14 Comments

 1. धन्यवाद शव्द मशाल. असेच माहिती पोचवत रहा. नागरीकांनी ⚔️घरात रहा सुरक्षित रहा.⚔️🙏🙏

  ReplyDelete
 2. हा एक लढा कोरोना चा ⚔️⚔️⚔️⚔️

  ReplyDelete
 3. काही ही बातम्या देऊ नका.. सायले गावा मध्ये अस काही नाही

  ReplyDelete
  Replies
  1. सदरची अधिकृत माहिती आरोग्य विभागाने दिली आहे

   Delete
  2. अधिकृत पत्र बातमीच्या शेवटी जोडला आहे. कृपया वाचावे... प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद

   Delete
 4. Sayale chi sadar vakati hi panvel la rahat hoti

  ReplyDelete
  Replies
  1. माहितीमध्ये भर पडली... अशीच योग्य माहिती कळवावी... धन्यवाद

   Delete
 5. Replies
  1. हो, नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे

   Delete
 6. Shabd mashal mule khri aani update mahiti murbad karanna milte v asich mahiti hya pudhe hi aapn uplabdh karun dyavi hi vinanti

  ReplyDelete
 7. नक्कीच... धन्यवाद

  ReplyDelete