Devendra Fadnavis In Murbad : नालायकांना सांगा, घंटा खुर्चीचा खेळ नसून देश चालवायचे; पाटील-कथोरे हात नसून माझे डोळे... राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला; फडणवीस यांची भविष्यवाणी काय? पहा देवेंद्र फडणवीस यांचे मुरबाडमधील अनकट भाषण... Kishor Gaikwad


Devendra Fadnavis In Murbad : नालायकांना सांगा, घंटा खुर्चीचा खेळ नसून देश चालवायचे; पाटील-कथोरे हात नसून माझे डोळे... राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला; फडणवीस यांची भविष्यवाणी काय? पहा देवेंद्र फडणवीस यांचे मुरबाडमधील अनकट भाषण...

ठाणे/मुरबाड (दि. १३) : (किशोर गायकवाड) राज्यभराचं लक्ष वेधून घेतलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रचार कार्याचा अनस्टॉपेबल सपाटा लावला असून भाजपा उमेदवार कपिल पाटील यांना विजय मिळवून देण्यासाठी आज मुरबाडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.


  यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, आमदार किसन कथोरे, विधानपरिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, आरपीआय (आ) महाराष्ट्र उपाध्यक्ष मेहेबूबभाई पैठणकर, राष्ट्रवादी (AP) नेते प्रमोद हिंदुराव, भिवंडी लोकसभा शिवसेना संघटक सुभाष पवार, भाजपा ठाणे ग्रा. जिल्हाध्यक्ष सह अन्य युतीपक्षातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. शहरातील माऊली गार्डन येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याचे आयोजन भाजपा मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शिवसेना मुरबाड तालुका प्रमुख प्रकाश पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस (AP) तालुकाध्यक्ष चंद्रकांत बोष्टे, आरपीआय (आ.) मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, मनसे मुरबाड तालुकाध्यक्ष आशिष रत्नाकर, कुणबी सेना मुरबाड अध्यक्ष गुरूनाथ एगडे, श्रमजिवी संघटना तालुकाध्यक्ष पंकज वाघ यांनी केले.


 जिल्हापरिषदेच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा फायदा लोकसभेला होऊन मुरबाड हा सर्वात जास्त मताधिक्य देणारा मतदारसंघ झाला पाहिजे. तसेच रेल्वे कामाला गती द्या, असे व्यक्तव्य सुभाष पवार यांनी व्यासपीठावरून केले. फडणवीस यांच्या डावी आणि उजव्याकडे बसलेल्यांचे मनोमिलन चांगले केले तर काही पाहण्याची आवश्यकता राहणार नाही, असा चिमटा प्रमोद हिंदुराव यांनी आमदार-खासदार यांना भाषणातून काढला. महाराष्ट्र सर्वात जास्त निधी माझ्या मतदारसंघात आहे, काचेच्या स्काय वॉक करिता अर्थसंकल्पात २६६ कोटींच्या निधीची मंजुरी दिली, बारवी धरण होतच नव्हतं, त्यामुळे गावात मुली द्यायला तयार नव्हते, मात्र ते होऊन १२०४ पैकी ४१९ बारवी धरणग्रस्तांना नोकऱ्या दिली, मागच्या वेळे पेक्षा अधिक लीड मुरबाड मधून मिळेल, जातीपातीच्या नावाने नाही तर विकासाच्या नावाने मते मागितली पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी भाषणातून केले. तर देवेंद्र मतांचा पाऊस घेऊन आले, असा आशावाद सुरुवातीलाच कपिल पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.


 या मेळाव्याला संबोधित करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. याबाबत फडणवीस यांच्या अनकट भाषण शब्द मशालच्या माध्यमातून या बातमीपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.



(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...


















Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor Gaikwad Murbad

0 Comments