प्रतीक्षा संपली : बहुप्रतिक्षित मुरबाड संदर्भ आणि इतिहास पुस्तक वाचकांच्या भेटीला..! [KISHOR K GAIKWAD]



प्रतीक्षा संपली : बहुप्रतिक्षित मुरबाड संदर्भ आणि इतिहास पुस्तक वाचकांच्या भेटीला..!


[KISHOR K GAIKWAD]

ठाणे/मुरबाड (दि. १७) : (किशोर गायकवाड) ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या मातीतील सुप्रसिद्ध इतिहासकार योगेंद्र बांगर सर लिखित व संपादित बहुप्रतिक्षित 'मुरबाड संदर्भ आणि इतिहास' या पुस्तकाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन करण्यात आले.




  मुरबाड शहरातील कुणबी समाज हॉल येथे हा भव्यदिव्य प्रकाशन सोहळा संपन्न झाला. विविध मान्यवर व इतिहास प्रेमींच्या साक्षीने कोकण प्रांतीय डी. आय. जी. व मुद्रांक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिद्ध लेखक, इतिहास संशोधक आणि मोडी लिपी तज्ञ योगेंद्र उर्फ राज मेमाणे यांच्या हस्ते या ग्रंथाचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले.




 त्यामुळे अनेक दिवसांपासून मुरबाडकरांना प्रतीक्षा असलेल्या मुरबाड संदर्भ आणि इतिहास हे पुस्तक आता तमाम इतिहास वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाची मूळ किंमत ३९९ रुपये असून प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने सवलत म्हणून केवळ ३०० विक्री करण्यात आले. तर ९४०३०४८८०४ या क्रमांकावर संपर्क करून हे पुस्तक वाचक प्राप्त करू शकतात. 




  या प्रकाशन सोहळ्या करीता मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी, आकाशवाणी निवेदक चंद्रशेखर पाटील, डॉ. जितेंद्र भामरे, प्रा. वि. वा. यशवंतराव, डॉ. गीता विशे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मुरबाड तालुक्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व पत्रकार मंडळींनी याप्रसंगी उपस्थिती दर्शविली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरेंद्र सोष्टे यांनी केले.






  या प्रकाशन सोहळा दरम्यान इतिहास प्राध्यापिका डॉ. गीता विशे यांनी पुस्तकात दडलेला इतिहास थोडक्यात आपल्या शैलीत विशद केला. तर डॉ. जितेंद्र भामरे यांनी, 'गर्जा जयजयकार क्रांतीचा, हिरे माणिक सोने उधळा, योगेंद्र बांगर तुम्हाला मानाचा मुजरा' अशा कौतुकाच्या पंक्तीनी शुभेच्छांची सुरुवात करीत अगदी काव्यात्मक पध्दतीने उपस्थितांचे नामोउल्लेख केले. तर या पुस्तकाच्या कामी काही मदत लागल्यास ती करणार असल्याचे आश्वासन तहसीलदार संदीप आवारी यांनी आपल्या शुभेच्छांच्या माध्यमातून देऊन, या पुस्तकाला भविष्यात एखादा पुरस्कार नक्कीच मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. इतिहास संशोधक मेमाणे यांनी इतिहासाची विविध अंगे मांडत आपल्या मनोगताला सुरुवात केली व पुस्तकाचे गोड कौतुक केले. अंतिमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष खांडेकर यांनी आपले अनुभव मांडून पुस्तक व लेखक बांगर सर यांना शुभेच्छा दिल्या.


मुरबाडच्या पत्रकारांकडून लेखक योगेंद्र बांगर यांचा सन्मान

  मुरबाड संदर्भ आणि इतिहास या पुस्तकाच्या आगमनाने मुरबाडचा दडलेला उपेक्षित इतिहास प्रकाशात येणार असून वाचकांना मुरबाडच्या गुप्त ऐतिहासिक पैलूंना स्पर्श करता येणार आहे. त्यामुळे वाचक वर्गात आनंदनाचे वातावरण पाहायला मिळत आहे.






 -KISHOR K GAIKWAD

वाचा...








Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments