Big Updates : देवेंद्र फडणवीस आज मुरबाड दौऱ्यावर; कपिल पाटीलांची पत्रकार परिषद, त्यात प्रश्नांचा भडिमार... पहा व्हिडिओ... Kishor K Gaikwad


Big Updates : देवेंद्र फडणवीस आज मुरबाड दौऱ्यावर; कपिल पाटीलांची पत्रकार परिषद, त्यात प्रश्नांचा भडिमार... पहा व्हिडिओ...

Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. १३) : (किशोर गायकवाड) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुरबाड दौऱ्यावर येणार असल्याची माहिती काल तातडीने आयोजित करण्यात आलेल्या मुरबाडच्या पत्रकार परिषदेत भाजपा लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास म्हसा मार्गावरील माऊली गार्डन येथे महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


  मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यलयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी कपिल पाटील यांचे समवेत सुभाष पवार, हरेश खापरे व अन्य कार्यकर्ते होते. दरम्यान पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला, तर त्यावर कपिल पाटील यांनी साधक-बाधक उत्तरे दिली.




• प्रश्न : खासदार विकासा कामांचा ठेकेदारांकडून कमिशन घेतात, सांबरे यांचा भाषणातून आरोप आहे. 



• प्रश्न : घरत साहेब, उल्हासदादा, सुहासभाऊ मोरे आमच्या विरोधात गेल्यास साधा ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नाही, सांबरे यांची अप्रत्यक्ष धमकी?



• प्रश्न : बाळ्यामामांचा आपल्यावरील आरोप... कपिल पाटील साहेबांना खासदारकी काय आहे हेच कळलं नाही?



• प्रश्न : आमदार कथोरेंचा एकही कार्यकर्ता आपला १००% प्रचार करत नाही?



• प्रश्न : खासदाराने त्रास दिलेले काही कार्यकर्ते व दोन-तीन नेते मंडळी आमच्या सोबत असल्याचे सांबरे यांचे म्हणणे आहे.



• प्रश्न : सुभाषदादांच्या गणवाइज प्रचारात भाजपाचे काही कार्यकर्ते दिसत नाही.



• प्रश्न : कुणबी कार्डचा फरक पडेल का?



• प्रश्न : तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण वाटतो?



• प्रश्न : भिवंडी मतदानसंघातील अस्वस्थ काँग्रेसला सोबत घ्यायाल का?



• प्रश्न : सुभाषदादा विधानपरिषदेवर की विधानसभेवर?



• प्रश्न : हॅट्रिक होणार का?


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...

















Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor Gaikwad Murbad

0 Comments