MOST VIRAL : माननीय आमदार कथोरे साहेबांचा आपल्या लिडमध्ये वाटा असेल का? एक ओळीचा प्रश्न एवढा का गाजतोय? करेक्ट कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत..? काय भानगड..? वाचा पुढे...
ठाणे/मुरबाड (दि. २८) : (किशोर गायकवाड) 'माननीय आमदार किसन कथोरे साहेबांचा आपल्या लिडमध्ये वाटा असेल का?' शब्द मशालच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या 'या' राजकीय प्रश्नाने अवघा महाराष्ट्रच नव्हे तर थेट दिल्लीचा भाजपेयी तख्त देखील गाठला आहे. या प्रश्नाला आज चौथा दिवस उजेडला, परंतु चर्चा मात्र अजूनही वेग धरूनच आहे.
शुक्रवार दि. २४ मे रोजीच्या भाजपा (BJP) लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांचे मार्फत तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मौखिक उद्गारलेल्या या प्रश्नाने, पाचवी बारसं होऊन आता चांगलंच बाळसं धरलंय. मुरबाडच्या भूमीतून उभा राहिलेला जनतेच्या मनातील हाच तो प्रश्न पुढे अवघा राज्य नव्हे तर राजधानीच्या भाजपा सलतनत पर्यंत जाऊन धडकला. तमाम वृत्तवाहिन्यांनी यावर निर्भीडपणे थेट प्रक्षेपण तथा वृत्तांकन ही प्रसिध्द केले.
[https://youtu.be/q7QhHveXVIU?si=Dsa6VuICa5BgEShs]
मुरबाड भाजपातील 'कपिल पाटील समर्थक' यांचेकडून मतदान आढावा व आभार भेटी दरम्यान शिवळे येथील सुभाष पवार (Subhash Pawar) यांचे जनसेवा प्रतिष्ठान कार्यलयात ही शाब्दिक चकमक घडली होती.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांचे निवडणूक मतदान प्रक्रिये दरम्यान मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी पक्षा अपरोक्ष कार्य करून विरोधकांना सहकार्य केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष केला आहे. यासंदर्भात तीव्र चर्चा नाक्या नाक्यावर पोहचली असतांना आमदार कथोरे यांनी अद्यापही यावर पत्रकार परिषद घेतली नसून अथवा अधिकृतपणे आपली जाहीररीत्या बाजू मांडलेली दिसून आली नाही.
[https://youtu.be/q7QhHveXVIU?si=Dsa6VuICa5BgEShs]
याबाबत कथोरे समर्थक सोशियल मीडिया प्लॅटफॉर्मवर कपिल पाटीलांच्या उत्तराचे खंडन करीत असून हा वाक्य कथोरे साहेबांसाठी नसून त्याकरिता 'मी कोणाचे नाव घेतले नाही' या पाटील यांनी हातचा राखण्यासाठी तत्क्षणी उद्गारलेल्या उग्र मुखवाक्याचा सोयीस्कर हवाला देत आहे. मात्र वस्तुस्थिती खऱ्यार्थी जगजाहीर म्हणावी लागेल. तथापि, असंयमाने वदवून निघालेला कपिल पाटील यांचा हा सूतोवाच मुरबाड-भिवंडीच्या राजकारणातील माइलस्टोन म्हणून नोंद होत आहे.
मुळात जगमान्य असलेला केके-केपी वाद शमविण्यासाठी दिग्गजां मार्फत करण्यात आलेले पराकाष्ठाचे प्रयत्न समस्त मुरबाडवासीयांनी अनुभवले. शिवाय भाजपा आमदार कथोरे यांनी प्रचार कालावधीत मुरबाडांत आयोजित मेळाव्यांमध्ये दोन वेळा पाटीलां समवेत व्यासपीठ देखील सामायिक केले होते. दरम्यान भर सभेला संबोधित करतांना आमदार साहेबांनी दिलेली ग्वाही? या सर्वश्रुत बाबी यशस्वी मनोमिलनाची साक्ष देत असतांना भाजपा उमेदवार पाटील यांना मतदान प्रक्रिये नंतर याच प्रश्नावर अनावर होऊन कथोरेंवर संशय घेण्याची वेळ का आली? या प्रश्नाच्या उत्तराची आतुरता संभाव्य 'करेक्ट कार्यक्रमाच्या' प्रात्यक्षिक प्रतिक्षेपेक्षा सर्वधिक सर्वत्र जाणवत आहे.
0 Comments