ऐलान-ए-काऊंटडाऊन : प्रतीक्षा अंतिम टप्प्यात, रात्र वैऱ्याची? ४ जून राजकारणात इतिहास घडविणार; उद्याचा निकाल काहीही असो, करेक्ट कार्यक्रमाचा निकाल कधी? संयमाचे अवघे काही तास, तत्पूर्वी 'हे' आयतेच वाचनास; विजयी उमेदवार कोण? वाचा लिंकमध्ये... -Kishor Gaikwad


ऐलान-ए-काऊंटडाऊन : प्रतीक्षा अंतिम टप्प्यात, रात्र वैऱ्याची? ४ जून राजकारणात इतिहास घडविणार; उद्याचा निकाल काहीही असो, करेक्ट कार्यक्रमाचा निकाल कधी? संयमाचे अवघे काही तास, तत्पूर्वी 'हे' आयतेच वाचनास; विजयी उमेदवार कोण? वाचा लिंकमध्ये...

-Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. ) : (किशोर गायकवाड) लोकसभेच्या समरात उडी घेतलेल्या उमेदवारांचा पंचवर्षीय भवितव्य अवघ्या रात्रभराच्या प्रतीक्षेवर येऊन ठेपला असून संभ्रमित एक्सिट पोलच्या कांगाव्याला देखील उद्या पूर्ण विराम मिळणार आहे.


  उद्या दि. ४ जून रोजी देशाच्या १८ व्या लोकसभेचा निकाल घोषित होणार असून उद्याचा सूर्य हा देशाच्या राजकारणात एक नवी पहाट घेऊन येणार असल्याने याबाबत सर्वत्र हुरहुर पाहायला मिळत आहे. या सर्वात, विशेष करून ठाणे जिल्ह्यातील 'भिवंडी लोकसभा मतदारसंघ' (Bhiwandi Loksabha Matdarsangh) प्रसारमाध्यमांवर सर्वधिक चर्चेत राहिला. त्यामुळे भिवंडी लोकसभेचा निकाल लक्षवेधी ठरला आहे.


  भिवंडी लोकसभेत नशीब आजमवणाऱ्या २७ उमेदवारांपैकी 'भाजपाचे कपिल मोरेश्वर पाटील' (कपिल Patil) 'विरुद्ध: राष्ट्रवादीचे (SP) 'सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्यामामा)' (Suresh Mhatre)  'विरुद्ध' अपक्ष 'निलेश भगवान सांबरे (आप्पा)' (Nilesh Sambare) हे तीन उमेदवार सर्वाधिक चर्चिले गेले. 


 भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या मुरबाडमध्ये झालेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेने मुरबाडच्या राजकारणाला नव्या तर्काकडे नेले आहे. लोकसभेच्या राजकीय कामात मुरबाड विधानसभेचे भाजपा आमदार 

किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांनी केवळ आभासी भूमिका बाजावल्याचा आरोप भाजपा उमेदवार कपिल पाटील यांचेकडून करण्यात आल्याने जिल्ह्याचं अवघे राजकारण एका प्रश्नावरील उत्तराच्या अवतीभोवती फिरत आहे. त्यामुळे उद्या निकाल काहीही असो, मात्र 'करेक्ट कार्यक्रमाच्या' निकालाची तारीख किती? आणि स्वरूप काय? हे मुकप्रश्न असंयमींच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेले भासत आहे.

 

करेक्ट कार्यक्रम : मतदान प्रक्रिये दरम्यान मुरबाड विधानसभा क्षेत्रात पक्षीय कामकाजात आमदार कथोरेंकडून अफरातफर करण्यात आल्याचा गंभीर आरोप पाटील यांचेकडून करण्यात आला. यावर तातडीच्या शॉर्ट टाइम पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडतांना कपिल पाटील यांनी करेक्ट कार्यक्रमाचा प्रत्यक्ष इशारा दिला. मात्र, हे 'करेक्ट कार्यक्रम' नेमकी भानगड तरी काय? हे कोडं डोके खाजवायला भाग पाडत आहे. त्यामुळे याची प्रचिती आल्या शिवाय नेमका खुलासा होणार नाही, तूर्तास हेच सत्य!


मतमोजणी : देशाचे लक्ष लागून असलेल्या नियोजित मतमोजणीला उद्या सकाळपासून सुरुवात होईल. देशात टप्याटप्याने झालेल्या निवडणूकांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंदिस्त आहे. दरम्यान, एवढ्या दिवस कैद असलेल्या मतपेटीतील निकाल शंकेला देखील आमंत्रण देत आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक अघटित घडामोडी समोर येण्याची संभावना व्यक्त केली जात असून भिवंडी लोकसभेचे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


भाजपाचे कमळ : उद्याच्या निकालात भिवंडी लोकसभेत कामलोदय होईल, अशी निकालपूर्व घोषणा भाजपाकडून आधीच करण्यात आली आहे. शिवाय, तसे वेळोवेळी समोर आणून ठेवलेल्या कथित एक्झिट पोलांनी देखील भाजपाला देशभर प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे जनतेच्या मेंदूवर बिंबविण्याचे काम या एक्झिट पोल यंत्रणेकडून अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहे. तसेच भिवंडी लोकसभा अंतर्गत सहा विधानसभेंचा षटकोन भाजपाच्या पारड्यात आहे. अशातच, विजयची माळ भाजपा उमेदवारांच्या गळ्यात पडल्यास मुरबाड विधानसभा वगळता उर्वरित पाच ही विधानसभा कपिल पाटीलांची बलस्थाने बनतील.


राष्ट्रवादीची तुतारी : दोन कापांमध्ये विभागलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातून (Sharadchandra Pawar Party) सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडविल्याचा दावा केला जातोय. मामांचे समर्थक उद्याच्या निकालासाठी जय्यत तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र राज्यातून भाजपाला पराभूत करण्यासाठी मविआने आवळलेली वज्रमुठ मुरबाडमध्ये ऐन निवडणुकीत काही सैल पडल्याचे दिसून आले होते. मात्र नाराज काँग्रेसची पिछेमुड कितपत प्रभाव टाकेल? हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


अपेक्षांची शिलाई मशीन : या लोकसभेतील बहुचर्चित त्रिमूर्ती उमेदवारांपैकी जिजाऊ संस्थेचे (Jijau Sanstha) अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या 'शिलाई मशीन' निशाणी पेक्षा त्यांची 'कुणबी जात' जास्त अधोरेखित झालेली म्हणावी लागेल. राजकीय पुढारी, कार्यकर्ते यांचा अभाव असताना केवळ संस्थेच्या सोशियल वर्क आणि वर्करांवर सांबरे यांनी निवडणूकीची लढाई उभी केली. संस्थात्मक पार्श्वभूमीवर शिलाई मशीनची राजकीय घोडदौड मोठ्या दिमाखात पाहायला मिळाली. विजयाच्या विश्वासात सांबरे यांच्या समर्थकांनी निकाल पूर्व डीजे, गुलाल याचे नियोजन आखून ठेवल्याचे बोलले जाते. मात्र विजयाची माळ कोणाची प्रतीक्षा करते हे उद्याच कळेल...


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...
































Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments