बिग ब्रेकिंग : करेक्ट कार्यक्रम? आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीसाठी माजी मंत्र्यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र... 'उमेदवार कपिल पाटील त्यांना "पराभुत" करण्यासाठी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना सांगीतले...' मुरबाडच्या राजकारणात खळबळ...
-Kishor Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. ३) : (किशोर गायकवाड) लोकसभा निकालाच्या पूर्वसंध्येला एक खळबळजनक माहिती समोर आली असून भाजपा पक्षाचे माजी मंत्री यांनी आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
याबाबत हाती लागलेल्या पत्रावरून, भाजपा पक्षाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजपा पक्षाचे राज्यस्तरीय पक्ष श्रेष्ठी तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. ३० मे रोजी पत्र सादर केले आहे. यात त्यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांनी 'उमेदवार कपिल पाटील त्यांना "पराभुत" करण्यासाठी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना सांगीतले ज्या ठिकाणी "आगरी" समाजाची गांवे आहेत. तेथे श्री. बाळयामामा म्हात्रे हयांची निशाणी "तुतारी"ला मतदान करा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे अपक्ष उमेदवार श्री. निलेश सांबरे हयांची "शिलाई मशिन"ला मतदान करा असे ताकीद देऊन सांगीतले.' असे स्पष्ट शब्दात म्हंटले आहे.
तसेच 'आ. किसन कथोरेंच्या हया वागणूकीमुळे प्रामाणिक कार्यकार्त्यांमध्ये असंतोष आहे. पक्षाचा उमेदवार "पराभूत" करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली त्या आमदार किसन कथोरे हयांची पक्षातून हकालपट्टी करावी हि विनंती.' असे अधोरेखित केलेल्या गडद शब्दात पत्रात नमूद आहे.
या सर्वात आता अनेक राजकीय बाबी सुस्पष्ट होतांना दिसत असून केपी-केके संघर्षात आता माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी देखील उडी घेतल्याने मुरबाडच्या राजकारणात आणखीन किती उलथापालथ घडून येते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
0 Comments