भिवंडी लोकसभेचा पहिल्या टप्प्यात प्रवेश : एकमेकांची उणिधुनी काढत तीनही बहुचर्चित अर्ज लोकशाहीच्या दरबारी दाखल; आता प्रतीक्षा 'या' उमेदवाराच्या माघारीची? वाचा...
![]() |
Kapil Patil यांचा उमेदवारी अर्ज दाखल |
भिवंडी मतदारसंघात साम दाम दंड भेद पुरस्कृत ट्वेंटी फोर अवर्स इलेक्शन मोडमध्ये असलेल्या भाजप, आरएसएस सारख्या शक्तिशाली पक्ष-संघटनेंच्या प्रचार आणि प्रसार यंत्रणांच्या पाठबळावर लक्षवेधी शक्तिप्रदर्शन करीत कपिल पाटील (Kapil Patil) तिसऱ्यांदा सांसद करीता नशीब आजमावत आहे. तर विविध पक्षांचा अनुभव घेतलेले सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (Balyamama) हे नुकताच काडीमोड झालेल्या राष्ट्रवादीतून मतदारांना साद घालत आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये झडपोलीच्या सामाजिक आणि शैक्षणिक आधारवड संचालित अवघ्या तरुण संस्थेच्या जाहिरात कार्यातून नुकताच बाळंत झालेल्या विकास पार्टीतून निलेश सांबरे (Nilesh Sambare) यांनी आपला मतदारसंघ सोडून उडी घेतली आहे.
![]() |
Nilesh Sambare यांचा उमेदवारी अर्ज दाखल |
या निवडणुकीत सांबरे यांची मोठी गळचेपी झाली असल्याचे बोलले जात आहे. मुळात बाळ्यामामा आणि सांबरे यांचे चांगले मित्रत्व अनेकदा समोर आले असतांना दोघेही आज निवडणूकीच्या मैदानात एकमेकां समक्ष आव्हान म्हणून उभे आहे. तथापि, एक मोठा शासकीय बोजा आणि कारवाई सांबरेंची वाट पाहत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सांबरे यांना आपला प्रस्थ वाचवण्यासाठी नेमून दिलेली भूमिका बजावावी लागेल, अन्यथा एका 'ओपनली सिक्रेट' असलेल्या संकटाच्या तावडीत सांबरे सापडतील, अशी संभाव्य वस्तुस्थिती वर्तवली जात आहे. त्यामुळे यदाकदाचित सांबरे निवडून ही आले तर ते भाजपमध्ये दिसल्यास मतदारांना आश्चर्य वाटलायला नको.
![]() |
Suresh (Balyamama) Mhatre यांचा उमेदवारी अर्ज दाखल |
भिवंडी मतदारसंघाला हल्ली मॅनेजमेंटचा इतिहास जोडला जात असल्याचे बोलले जात आहे. मतदार वर्ग निष्ठेने आपल्या विश्वासु उमेदवाराला मतदान करतात, त्याकरिता कार्यकर्ते अगदी जीव पणाला लावून त्याचा प्रचार देखील करतात. परंतु पडद्याआड काय शिजतं? याची कल्पना या कार्यकर्ते व मतदार वर्गाला अजिबात नसते. त्यामुळे या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भिवंडी मतदारसंघात आणखीन काय नवीन पैलू समोर येतात? हे माघार प्रक्रिये नंतरच कळेल.
0 Comments