भुवनात राडा : गाडी फोडली; डोक्याला टाके; पुढील उपचारासाठी सांबरेंच्या कार्यकर्त्यांना उल्हासनगर येथे हलविले... पहा फोटो...
ठाणे/मुरबाड (दि. २०) : (किशोर गायकवाड) देशातील लोकसभेचा पाचवा टप्पा आज समाप्त होत असताना भिवंडी मतदारसंघातील मुरबाड तालुक्याच्या भुवन या गावी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला गालबोट लागण्याची घटना घडली आहे.
याबाबत प्राप्त माहितीवरून, लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांबरे (Nilesh Sambare) यांच्या जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते तथा तालुक्यातील भुवन ग्रांमपंचायतीचे माजी सरपंच दौलत बांगर व कार्यकर्ते जयवंत बांगर यांच्या वाहनाला आज दुपारी भुवन पाडा येथे अन्य वाहन चालकानी अडविले. सदर वाहनातून काही माणसांनी उरतून बांगर यांच्या वाहनाची तोडफोड करून दौलत बांगर व जयवंत बांगर यांच्यावर हल्ला चढविला.
यामध्ये एकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली तर दुसऱ्या कार्यकर्त्याला देखील जबर मारहाण झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी मुरबाड शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या वाहनाची ही मोठी नुकसानी झाली असून जखमींना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष व लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी कॉल रेसिव्ह केला नाही. सदरचा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांकडून केला असल्याची चर्चा असून याप्रकरणी मुरबाड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0 Comments