
Suresh (Balyamama) Mhatre

वाचा : शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या शाही धरणाबाबत भर सभेत बाळ्यामामांनी कपिल पाटलांना काय सल्ला दिला?
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) भिवंडी लोकसभा निवडणूक संग्रामात मविआ वर्सेस भाजपा अशी खडाजंगी रंगत चालली असून एकमेकांवर आरोप प्रतिरोपांचा भडिमार उमेदवार दिग्गजांकडून सुरू आहे.
![]() |
Kapil Patil v/s Balyamama |
मुरबाड शहरात नुकताच झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी आपल्या भाषणात भाजपा उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांचेवर खरपूस टीका केली आहे. दरम्यान मुरबाड तालुक्यातील काळू शाही धरणाच्या संवेदनशील मुद्द्याला त्यांनी हात घातला होता.
![]() |
Balyamama Speech in Murbad |
मुरबाड तालुक्यातील काळू शाही धरणात जमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना जागेच्या बदल्यात जागा, घरटी नोकरी मिळवून द्यावी, भरघोस मोबदला मिळवून द्यावा, अशा आशयाचा औपचारिक सल्ला बाळ्यामामा यांनी खासदाराची कामे समजवतांना आपल्या भाषणातून कपिल पाटील यांना दिला होता. मात्र, मुळात काळू नदीवरील शाही धरणाला बाधित शेतकरी व गावकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याची कल्पना बहुदा बाळ्यामामा यांना नसावी? त्यामुळे बाळ्यामामांनी अभ्यास करून सल्ले दिले पाहिजेत, अशा खांदेपालट टिपणीचा जणू आहेर त्यांना सत्तेकरी गटाकडून दिला जात आहे.
![]() |
MLA Kisan Kathore |
शिवाय खुद्द आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांनी मागील अधिवेशनात राम बांगर यांच्या बारवी धरणाच्या तारांकित मुद्या समवेत सपोर्टिव्ह मुद्दा म्हणून 'काळू शाही धरण माझ्या मतदारसंघातील असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही तो होऊ देणार नाही' असा स्पष्ट शब्दात इशारा दिला होता. तद्नुरुप काळू नदीवरील शाही धरणास मुरबाडकरांचा प्रखर विरोध असतांना ही भर सभेत बाळ्यामामा यांनी कपिल पाटील यांना उलटपक्षी सल्ला देण्याचे हास्यास्पद धाडस केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याबाबत खासदार कपिल पाटील नेमकी काय काउंटर प्रतिक्रिया नोंदवितात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
तर निवडणूक आयोगाने आखलेल्या लोकसभेच्या मैदानात भिवंडी लोकसभा मतदारसंघात तीनही राजकीय पैलवान दंड थोपटून एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. आज (दि. ३० रोजी) निलेश सांबरे (Nilesh Sambare) हे वंचितच्या पाठिंब्याने भिवंडी येथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच गुरुवारी (दि. २ रोजी) सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे तर शुक्रवारी (दि. ३ रोजी) कपिल पाटील शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु आर्थिक अमिषावर कधी-कुठे मनोमिलन होऊन जाईल? पत्ता लागायचा नाही, त्यामुळे घटकपक्षीय अंतर्गत संभाव्य गुप्त तडजोडीची भीती बाळगून आहेत का? असे चित्र भासत आहे. सबब सहकारी पक्षाचे कार्यकर्ते केवळ पैशाने तगडा उमेदवार भेटला असल्याने किमान पैशाच्या व्यवहारात तरी 'तळे राखी; तो पाणी चाखी' या मूलमंत्रानुसार बाजी मारता येईल? या आशेत धडपड करतांना पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे.
-Kishor K Gaikwad
0 Comments