Loksabha in Murbad : मामाचा कारभार आता 'राम'भरोसे? अन् आप्पांच्या 'वर्करांना' मशागतीची गरज? मात्र राजकीय आवणी आटपून कपा टीम सराईच्या वाटेला...
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) लोकसभेचा निवडणूक प्रचार-प्रसार कालखंड जसजसा संपुष्टात येत आहे, तसतसे राजकीय अनुमानांना फाटे फुटत चालले आहेत. राजकारणात विभक्त, तडजोड आणि समेट या हा क्रम दुय्यम स्थानी गणला जातो.
त्यान्वये भिवंडी लोकसभेत राजकीय फाटा फुटींच्या वार्तांना पेव फुटत चालला आहे. नुकताच निवडणूक प्रचार प्रक्रियेतून दुर्लक्षित केल्याचा ठपका ठेवत मुरबाडच्या काँग्रेस पक्षाने मविआ विरोधी स्वतंत्र भूमिकेचा इशारा दिला आहे. तर भिवंडी परिसरात काँग्रेस सांबरेंच्या शिलाई मशीन सोबत जाणार असल्याची वेगळीच चर्चा आहे. मात्र या सर्वात भाजपाकडून (BJP) उर्वरित उमेदवारांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडणूकी करिता प्रशिक्षणाचे धडे घ्यावेत, असा ही टोला सत्तेकऱ्यांकडून लगावला जात आहे. नुकताच राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे [Suresh (Balyamama) Mhatre] यांचे मुरबाडमधील निकटवर्तीय भाजपाचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राम दुधाळे यांची राज्यपक्षाध्यक्ष यांनी भाजपातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे ते देखील बाळ्यामामा यांच्या सोशियल मीडिया प्रचारात उघडपणे उतरले असून यापुढील प्रचार - अर्थ - नियोजन - विनियोग आदी नीतीची धुरा राम दुधाळे यांच्यात हातात असतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
![]() |
Nilesh Sambare |
उमेदवार निलेश सांबरे (Nilesh Sambare) यांना मुरबाडच्या अन्य पत्रकारांची एलर्जी असल्याची चर्चा असून सांबरे यांच्या कन्स्ट्रक्शन माफियाने घेतलेली रस्त्याची विकास कामे ठिकठिकाणी फसल्याने परिणामी ऐन निवडणूकीत सांबरे मुरबाडच्या पत्रकारां समोर जाणे टाळत असल्याचे बोलले जात आहे. यात मुख्यत्वे करून मलमपट्टी करिता कुप्रसिद्ध असलेला शहापूर ते मुरबाडमधून कर्जतकडे जाणारा काँक्रीट मार्ग बहुचर्चित ठरला आहे.
शनिवारी (दि. ११) निलेश सांबरे यांची मुरबाडमध्ये प्रचार रॅली फिरली, परंतु याबाबत बहुतांशी पत्रकारांना कल्पना नव्हती. मुरबाड येथील भाषणा दरम्यान सांबरे यांनी कपिल पाटील (Kapil Patil) यांचेवर विकास कामांच्या निधीतून कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप केलेला व्हिडिओ वायरल होत आहे. तसेच घरत साहेब, उल्हास दादा, सुहासभाऊ मोरे आमच्या विरोधात गेल्यास साधा ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही, अशी अप्रत्यक्ष धमकी सांबरे यांनी भाषणातून दिली आहे. खासदाराने त्रास दिलेल्या कार्यकर्त्यां सह दोन-तीन चांगली मोठी मंडळी देखील मदत करीत असल्याची शॉकिंग न्युज यावेळी त्यांनी सांगितली. मात्र सांबरेकडून ही गुगली आहे की गौप्यस्फोट? याबाबत प्रतिस्पर्धींमध्ये डोके खाजव स्पर्धा सुरू झाली असून या गुप्त 'चांगली मोठी मंडळीं'चा शोध सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच देशातील कोणताच पक्ष न सोडल्याने बाळ्यामामा यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार देणार असल्याचे व्यक्तव्य सांबरे यांनी केले आहे.
![]() |
Kapil Patil |
तर बाळ्यामामांच्या बहुपक्षीय कार्यकर्त्यांत सद्या ताळमेळ राहिला नसल्याने मुरबाडच्या मविआ टीममध्ये पुरता गोंधळाची परिस्थिती दिसून येत आहेत. शिवाय वाढती अंतर्गत नाराजी, अनियोजित प्रचार, कामसू आणि विश्वासू कार्यकर्त्यांचा अभाव अशा विविध बाबींमुळे कदाचित राष्ट्रवादी उमेदवाराची रॅली फेल गेल्याचे भाकीत केले जात आहे.
![]() | |
|
तीनही तगडे उमेदवार सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर ताशेरे ओढत असले तरी आपापसातील अंतर्गत दोस्ताना राखून असल्याची देखील गुप्त चर्चा आहे. त्यामुळे 'कावळा पिंपेरी वाजवतो मामा भाच्यांना नाचवतो' असं म्हणण्याची वेळ कार्यकर्ते व मतदार यांचेवर आली आहे. तर येत्या २० तारखेपर्यंत कार्यकर्ते व उमेदवार मंडळींना किती आरोपांचा भार सहन करावा लागतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
0 Comments