दुःखद वार्ता : 'त्या' बेपत्ता तरुणाचा सापडला मृतदेह; मुरबाड शहराला पाणी पुरवठा करणारा धरण असुरक्षित? शिरवली डॅमची मालकी असणारे पाटबंधारे विभाग ही तितकेच दोषी? -Kishor Gaikwad


दुःखद वार्ता : 'त्या' बेपत्ता तरुणाचा सापडला मृतदेह; मुरबाड शहराला पाणी पुरवठा करणारा धरण असुरक्षित? शिरवली डॅमची मालकी असणारे पाटबंधारे विभाग ही तितकेच दोषी?

-Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. ३१) : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुक्यातील शिरवली येथील धरणात काल बेपत्ता झालेल्या धानिवली गावच्या ३५ वर्षीय तरुणाचा आज सकाळी मृतदेह सापडला आहे.


  जलतरणासाठी आपल्या चार मित्रांसमवेत गेलेल्या मुरबाड तालुक्यातील धानिवली गावच्या गणेश रामचंद्र भोईर (वय - ३५ वर्षे) या तरुणाचा काल उशिरापर्यंत अग्निशमन दल व पोलिसांकडून शिरवली धरणात शोध सुरू होता. मात्र अंधार होईपर्यंत यश हाती लागले नाही. परिणामी, शोधकार्य थांबविण्यात आले होते. तर आज सकाळी नव्याने पाण्यात शोध सुरू असताना साडेदहा वाजेच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे.



 काल मित्रांसोबत अंघोळीसाठी शिरवली डॅमला गेलेल्या गणेशची ती अंघोळ शेवटची ठरली. गणेशच्या पश्चात त्याच्या कुटुंबात त्याचे वृद्ध आईवडील, विवाहित बहीण, पत्नी आणि एक अपत्य, असा परिवार आहे. तर सदर मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून याप्रकरणी मुरबाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास मुरबाड पोलिस करीत आहेत.



 अशा घटना मुरबाड तालुक्यात नवीन नसून याकरिता डॅमची मालकी असणारे पाटबंधारे विभाग देखील तितकेच दोषी असल्याचे आरोप होत आहे. मात्र पावसाळा जवळ आला असून अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता काही ठोस उपाययोजना अथवा कारवाई होते का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

"डॅम आपल्या मालकीचा असून त्यात आमच्या प्रतिक्रियेचा काय संबंध? हा कायदा सुव्यवस्थेचा भाग आहे. आम्ही धरण बांधलाय, लोकांना कळाले पाहिजे तेथे पाणी आहे. प्रोटेक्शनसाठी असं काही नसतं, आपल्या इरिगेशनचा यात काही विषय नाही."

 -सुनिल दांडेकर, उपअभियंता पाटबंधारे उपविभाग, मुरबाड

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...






























Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments