ब्रेकिंग : धानिवलीचा तरुण शिरावली डॅममध्ये बेपत्ता; तहसिलदार, अग्निशमन, पोलिस घटनास्थळी दाखल; या घटनेला जबाबदार कोण? पहा, यावर तहसिलदार यांची प्रतिक्रिया...
ठाणे/मुरबाड (दि. ३०) : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुक्यातील शिरवली डॅममध्ये जलतरणासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी धानिवली येथील एक तरुण डॅमच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
![]() |
डॅमच्या पाण्यात बेपत्ता असलेला तरुण गणेश भोईर |
याबाबत मुरबाडचे तहसिलदार संदीप आवारी (Tahsildar Sandip Awari) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश रामचंद्र भोईर (वय - ३५ वर्षे) व त्याचे चार मित्र शिरवली डॅममध्ये (Shiravli Dam) पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी गणेश भोईर हा बुडल्याची खबर त्यांच्या मित्रांनी मुरबाड पोलिस स्टेशनला (Murbad Police Station) दिली. त्यानुसार मुरबाड एमआयडीसी व नगरपंचायतीचे अग्निशमन दल, पोलिस प्रशासन, महसूल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. रात्रीचे मदतकार्य सुरू ठेवता येणार नसल्याने आता यश न आल्यास उद्या सकाळी मदत कार्य चालू करण्यात येणार असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले.
![]() |
Shiravli Dam Search Operation |
![]() |
बेपत्ता गणेश भोईर |
मात्र या घटनेला जबाबदार कोण? या प्रश्नावर मुरबाडचे तहसिलदार यांनी जबाबदार कोणी नसल्याचे सांगून नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे, डॅम हे पोहण्यासाठी नसून आशा ठिकाणी पोहायला जाणे नागरिकांच्या जीवितास धोकादायकच असल्याचे सांगितले. तर याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेले मुरबाड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
0 Comments