Loksabha 2024 - मार्केटच्या चर्चा : मुरबाडमधून कोणाला पसंती? पहा व ऐका मुरबाड बाजारपेठेतील पथविक्रेते, व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया...
-Kishor K Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. १९) : (किशोर गायकवाड) देशातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा उद्या समाप्त होत असून निवडणूकीचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर होणार आहे. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे कपिल मोरेश्वर पाटील (Kapil Patil), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्यामामा [Suresh (Balyamama) Mhatre) व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांबरे (Nilesh Sambre) यांचे समवेत आणखीन २४ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
मात्र विजयाची माळ कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल? याबाबत मतदार वर्गामध्ये पाहायला मिळत असलेली उत्सुकता लक्षात घेऊन शब्द मशाल वृत्तसेवेच्या माध्यमातून मुरबाड बाजारपेठेतील पथविक्रेते, व्यावसायिक यांच्या प्रतिक्रिया वाचक वर्गापर्यंत पोहचविण्यात येत आहे. याबाबत वाचक वर्गाकडून कमेंटमध्ये प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
-Kishor K Gaikwad
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
-Kishor K Gaikwad
वाचा...
0 Comments