मोठी बातमी : डॉ. बेंढारी अपहरण तथा ३० लाख खंडणी प्रकरणातील ५ आरोपी जेरबंद..! [ KISHOR K. GAIKWAD]

 

5 accused in Dr. Bendhari kidnapping and 30 lakh extortion case jailed
आरोपींसोबत मुरबाड पो. स्टे. चे पीआय प्रसाद पांढरे व टीम

मोठी बातमी : डॉ. बेंढारी अपहरण तथा ३० लाख खंडणी प्रकरणातील ५ आरोपी जेरबंद..!

[KISHOR K. GAIKWAD]
मुरबाड (दि. २१) : (किशोर गायकवाड) मुरबाड शहरातील नामांकित प्रसुती तज्ज्ञ डॉ. जितेंद्र बेंढारी यांचे अपहरण करून लाखों रुपयांची खंडणी वसूल केल्या प्रकरणी शहरातील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेमुळे तालुक्यातील डॉक्टर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय मुरबाड पोलिसांच्या कार्यकर्तृत्वावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊन चर्चेला उधाण आले होते. मात्र मुरबाड पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्यपूर्वक केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   

5 accused in Dr. Bendhari kidnapping and 30 lakh extortion case jailed
murbad police station

  याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी मुरबाड शहरातील तन्मय मॅटर्निटीचे नामांकित प्रसूतीतज्ञ डॉ. जितेंद्र बेंढारी हे नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकी वरून घरी परतत असतात त्यांना अज्ञात इसमाने हात करून काही अंतरावर सोडण्यास सांगितले. यात पुढे जाऊन त्यांचे अपहरण झाले व अपहरण कर्त्यांना ३० लाख रुपये देऊन डॉ. बेंढारी यांनी आपली सुटका केल्याचे सांगितले. मात्र या घटनेची माहिती डॉ. बेंढारी यांनी दि. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी अर्थात घटनेच्या तब्बल २६ व्या दिवशी मुरबाड पोलिस सस्टेशनला दिली. त्यानुसार मुरबाड पोलिसांनी, मुरबाड पो. स्टे. गु. र. क्र. ३३७/२२ क ३६४, ३८७, ३४१, ३४२, ३२३, ५०४, ५०६ भां. द. वी. अन्वये दाखल गुन्हा नोंदवून कोणत्याही धाग्यादोऱ्यां अभावी तपासला सुरुवात केली व काल (दि. २० रोजी) आरोपितांना जेरबंद करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले. त्यांना शहापूर कोर्टात हजर केले असता दि. २७ तारखेपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेतील ५ आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून यातील ३ आरोपी मुरबाड तालुक्यातील देवगाव, एक शिरवली व एक बदलापूर येथील आहेत. तर अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे वपोनि प्रसाद पांढरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

5 accused in Dr. Bendhari kidnapping and 30 lakh extortion case jailed
Tanmay Maternity

  "सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नव्हता, फिर्यादी कडून देखील कोणतेही धागे दोरे मिळाले नव्हते, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून, अतिशय  बारकाईने तपास करून फिर्यादीचा पेशा, त्यांचे कामाचे स्वरूप, त्यांचे वर्तन आणि त्यातून निर्माण झालेले संबंध, त्या संबंधातील व्यक्ती व त्यांचे वर्तन, आर्थिक स्थिती याबाबत सविस्तर माहिती गोळा करून, तांत्रिक बाबींचा सखोल उपयोग करून डम डाटाची सखोल माहिती घेवून, त्याचे सूक्ष्म विवेचन करून, पुरावे गोळा करून पुराव्याची चैन तयार करून, टॉवर लोकेशन मिळवून त्याची गुन्ह्याशी जुळवणी करून, आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करून दि. २०/४/२३ रोजी ३ आरोपीना ताब्यात घेवून तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून सांगितलेली हकीकत गुन्ह्याच्या हकीकतीशी मिळती असल्याने त्यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना सर्व कायदेशीर पूर्तता करून सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्यात जलद तपास करून आणखीन दोन आरोपींना अटक केली आहे" अशी माहिती मुरबाड पोलिस स्टेशनकडून प्राप्त झाली आहे.

5 accused in Dr. Bendhari kidnapping and 30 lakh extortion case jailed
PI Prasad Pandhare and API Anil Sonone

  या पोलिसी तपास कार्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिस स्टेशनचे व.पो.नि. प्रसाद पांढरे, सपोनि अनिल सोनोने, पीएसआय अरुण सावंत, नरेश निंबाळकर, रामेश्वर तळेकर, सफौ. भगवान निचीते, पो.ना. अमोल माळी, सचिन उदमले, तांत्रिक अंमलदार दीपक गायकवाड, पो.शि. चालक शरद शिरसाट यांनी विशेष मेहनत घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
     
                                               -किशोर गायकवाड

मुरबाड पोलिसांचे अभिनंदन


_____________________________________________

वाचा...


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

एकवेळ नक्की भेट द्या..!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

0 Comments