MLA Kisan Kathore v/s MP Kapil Patil
राजकीय चकमक : ऐनवेळी कथोरेंनी पाठ फिरवल्याचा आरोप? समवेत मतांची चक्रे ही फिरवली? लोकसभेच्या धर्तीवर मतदान दिनी मुरबाडात काल नेमकं काय झालं? वाचा या उत्सुकतेचे सविस्तर निवारण...
ठाणे/मुरबाड (दि. २१) : (किशोर गायकवाड) राज्यात काल १३ लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची मतदान प्रक्रिया पार पडली. असे असताना अवघ्या राज्याचे लक्ष ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभेने वेधून घेतले होते. यामध्ये आमदार कथोरे यांच्या भूमिकेवर सर्वाधिक लक्ष होते. यात जी भीती होती ती खरी ठरली का? मुरबाडच्या राजकारणात काल नेमकी काय चकमक घडली? असे अनेक अनुत्तरित प्रश्न नव्याने उदयास आले आहेत. परंतु यांची उत्तरे उघड असतांना धाडसा अभावी यावर उघड चर्चा होतांना दिसून येत नाही.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांचा वाद ठाणे जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. नुकताच मुरबाडमध्ये झालेल्या महायुती मेळाव्यात राष्ट्रवादी नेते प्रमोद हिंदुराव यांनी देखील या वादाला थेट व्यासपीठावरून पुष्टी दिली होती. आमदार व खासदार यांचे मनोमिलन घडवून आणल्यास लोकसभा निवडणूकीच्या बाबतीत काही पाहायला लागणार नाही (Video - 01), असा टोमणा सदृश सल्ला भर सभेत प्रमोद हिंदुराव यांनी राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना भाषणातून दिला होता. अर्थातच ही धुसफूस त्यावेळी ही शिल्लक असल्याचे स्पष्ट होत आहे. मध्यंतरी भिवंडीच्या खड्ड्यांबाबत देखील आमदार कथोरे यांनी आपल्या भाषणातून जाणीवपूर्वक खोचक उद्गार काढल्याचे ऐकिवात आहे. यावर पुढे खासदारांनी देखील प्रतिउत्तराचे असाइनमेंट पूर्ण केल्याचे समजले. हे स्टेज-स्पीच वॉर दीर्घ काळ तग धरून असतांना मुरबाडमध्ये यालाच दुबार उद्घाटनांची देखील चांगलीच जोड लाभल्याचे म्हणावे लागेल.
लोकसभेच्या प्रचार काळात मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुरबाड सभेची वार्ता जाहीर करण्यासाठी खासदार पाटील यांनी शिवळे येथील आताचे सेनानेते सुभाष पवार यांच्या जनसेवा प्रतिष्ठान कार्यालयात तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी काळू-शाही धरणाच्या प्रश्नावर उत्तरतांना बारवी धरणाचा उल्लेख केला. बारवी धरणातील ४१८ लोकांना मी नोकऱ्या मिळवून दिल्या (Video - 02). असे स्पष्ट शब्दात त्यांनी पत्रकार मंडळींना सांगितले होते. कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम देखील सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. मात्र आमदार कथोरे यांनी दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आपल्या भाषणात बारवी धरणाच्या मुद्द्याला हात घालून मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रस्तावाला स्वीकारून १२०४ पैकी ४१९ बारवी प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्याचे भर सभेत म्हणत पाटील यांना घरचा आहेर दिला (Video - 03). याचवेळी आमदार कथोरे यांनी आपला प्रामाणिक कार्यकर्तेपणा मांडत अद्याप मंत्रिपद मिळाले नसल्याचे विरोधाभासातून हळूच समोर ठेवले. त्यामुळे बारवीचा आणि कल्याण-मुरबाडच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा नेमका श्रेय कोणाला? हे घटित संभ्रमात टाकणारे आहे.
अशा विविधांगी ईर्षात्मक वादांचा लवलेश मनात शिल्लक ठेवून ऐन निवडणूकीत कथोरे यांनी आपली भूमिका बदलल्याचा अप्रत्यक्ष आरोप कार्यकर्ते मंडळींकडून गुप्तपणे केला जात आहे. मुळात खासदार पाटील यांची गत दोन टर्म हा क्लेश धगधगत राहिला असतांना दरम्यानच्या काळात स्थानिक प्रसारमाध्यमांना हा आयताच खुराक सुध्दा झाला होता.
लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून आमदार कथोरे यांचे निकटवर्तीय समर्थक, कार्यकर्ते प्रचार कार्यात दुर्मिळ भासत होते. खुद्द आमदारांची देखील काही वेळा सभेंना दांडी आढळून यायची. मात्र पक्ष परिवारातील वरिष्ठ नेतेमंडळींच्या आगमन समयी आमदार साहेब आवर्जून हजेरी लावण्याचे सोपस्कार पूर्ण करायचे. शिवाय औपचारिकता म्हणून भाषणांतून खासदार यांना मुरबाड विधानसभेतून सर्वाधिक लीडसाठी आश्वस्त देखील करण्यात आले आहे. परंतु, ही वचनबद्धता पुढे ऐन मतदाना वेळी पाळली का? यावर भाष्य करण्याची वेळ उद्भवली आहे.
असे असतांना नेमकं ऐन मतदान प्रक्रियेत आमदार साहेबांकडून अत्यंत गुप्तशिरपणे मतांची चक्रे फिरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला का? याबाबत ओपनली सुरू झालेली सिक्रेट चर्चा उत्तराच्या शोधात आहे.
MLA Kisan Kathore and MP Kapil Patil at same stage with Deputy Chief Minister of Maharashtra in murbad |
यावर जुने-नवीन, सॉफ्ट-हार्ड अशी बहुआयामी मतमतांतरे ऐकिवात पडतात. ज्याअर्थी आमदार हे मर्यादित राज्य विधानसभेचे सदस्य असले तरी राजकीय परिघात त्यांची कारकीर्द तथा आयुर्मान व अनुभव; आदी खासदार पाटील यांच्यापेक्षा सिनियर मानले जाते. त्यान्वये, खासदार पाटील हे दोन टर्म लोकसभेचे सदस्य व त्यातच अडीज वर्षे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून संसदेत कार्यान्वित राहीले आहे. तथापि, यावेळेस खासदार हे पुन्हा नव्याने निवडून आल्यास या वादाचे वय आणखीन पाच वर्षांनी वाढेल. दरम्यान आमदार यांना पुन्हा हा कालखंड खासदार यांचे समवेत संघर्षात खर्ची घालवावा लागेल. शिवाय मंत्र्याच्या विजया नंतर पुन्हा खासदार पाटील यांच्या पदरी मंत्रीपद येणे अनाहूत ठरेल. अशी काही संभाव्य भीती व त्यांच्या सोबत तोंडावर आलेली विधानसभा डोक्यात घेऊन आमदार यांना खासदारांच्या विजयापेक्षा पराभव अधिक फायदेशीर ठरेल? शिवाय नव्याने निवडून येणारा खासदार निश्चितपणे आमदार कथोरे यांचे ऋणात राहील. त्यामुळे आमदारकीच्या लढतीत सहकार्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच पुढील पाच वर्षे आपसी वादविवादातून सुध्दा बिनदिक्कत मुक्तता होते. हा राजकीय बेनिफिट डोळ्यासमोर समोर ठेवून काल मुरबाड विधानसभाक्षेत्रात भाजपाच्या आमदाराने भाजपाच्या खासदाराला आपल्या मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी यज्ञ चालविल्याचे गंभीर आरोप चर्चिले जात आहे. यापलीकडे विचार केल्यास आगामी मुरबाड विधानसभेला विद्यमान लोकप्रतिनिधींचा पुन्हा पक्षांतर घडून येईल का? असा ही सवाल समोर येतोय. असे असले तरी दि. ४ जून रोजी सर्व भाकितांची उत्तर आपसूकच समोर येतील. त्यामुळे समस्त राज्यातील मतदारसंघांपैकी मुरबाड तालुक्यात लोकसभेच्या निकालाची सर्वाधिक आतुरता पाहायला मिळत आहे... (क्रमशः)
0 Comments