Loksabha 2024 : 'सर्वसामान्य जनतेला प्रवासापासून, सुविधेपासून वंचित ठेऊन आता वंचितमध्ये उभे आहेत, ज्या भगिनींचे कुंकू पुसलं गेलंय ते ही गोष्ट विसरू शकत नाहीत ' मुरबाडच्या मेळाव्यात कपिल पाटलांचे निलेश सांबरेवर टीकास्त्र..! KISHOR K GAIKWAD


Murbad Mahayuti Melava


Loksabha 2024 : 'सर्वसामान्य जनतेला प्रवासापासून, सुविधेपासून वंचित ठेऊन आता वंचितमध्ये उभे आहेत, ज्या भगिनींचे कुंकू पुसलं गेलंय ते ही गोष्ट विसरू शकत नाहीत '


मुरबाडच्या मेळाव्यात कपिल पाटलांचे निलेश सांबरेवर टीकास्त्र..!

KISHOR K GAIKWAD

मुरबाड (दि. १२) : (किशोर गायकवाड) भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या वेगवान घडामोडी दरम्यान काल शुक्रवारी मुरबाडमध्ये महायुतीकडून जाहीर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. 




  यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील (Jagannath Patil), आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore), माजी आमदार कृष्णकांत तेलम, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, राष्ट्रवादी (A.P.) राज्य उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेना शिंदे गटाचे नेते सुभाष पवार यांचे सह भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (A.P.) रिपाइं (आठवले), मनसे आदी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 

 


  या मेळाव्याचे प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य उल्हास बांगर यांनी केले. तर माजी सिडको अध्यक्ष तथा राष्ट्रवादी (A.P.) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आपल्या भाषणा दरम्यान रेल्वेच्या मुद्द्याला स्पर्श करून हळूच शाब्दिक चिमटा काढत रेल्वे मुद्यांवर कपिल पाटील यांना निर्देशित केले. तसेच आमदार कथोरे यांनी आपल्या मतदारसंघातील विकासाचा पाढा वाचत पाटील यांना निवडून देण्यासाठी आवाहन केले. 





  अंतिमतः मेळाव्या समक्ष उमेदवार म्हणून व्यक्त होतांना कपिल पाटील (Kapil Patil) यांनी वक्त्यांच्या विविध मुद्द्यांना उत्तरे दिली. वडोदरा हायवेमुळे रेल्वेचे काम रखडले गेले असून रेल्वे शंभर टक्के येणार, त्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनींचा सर्व्हे जलदगतीने सुरू आहे, शिवाय शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना पाटील यांनी मागील निवडणूकीत मुरबाडमधून मते जास्त होती मात्र लीड कमी होता, यावेळी मते आणि लीड दोन्ही मुरबाडमधून अपेक्षित असल्याचे बोलले. तर प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश सांबरे यांच्यावर घणाघात करतांना, 'आमच्या सर्वसामान्य जनतेला प्रवासापासून, चांगली सुविधा मिळण्यापासून वंचित ठेवले आणि आता वंचितकडे गेले. ज्या भगिनींचे कुंकू पुसलं गेलंय त्या भगिनी, त्यांचे नातेवाईक ही गोष्ट विसरू शकत नाहीत', असे उद्गार काढले. तसेच मुरबाडमधील नॅशनल हायवेसाठी अनेक दिवस आम्हाला संघर्ष करावा लागला, त्यामुळे आता ते काम सुरू झाले आहे. वासिंद फ्लायओव्हरची ५० वर्षापूर्वीची मागणी पूर्ण झाली आहे. बदलापूरच्या होम फ्लॅटफॉर्मची सन १९८० ची मागणी मार्गी लागली आहे. मुरबाडचा समावेश एमएमआरडीए रिजनमध्ये करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बचतगटांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. अशा विविध मुद्द्यावर बोलतांना दरम्यान कपिल पाटील यांनी कार्यकर्ते यांचे देखील कौतुक केले.



 तर महायुती द्वारा आयोजित या मेळाव्यातून कपिल पाटील यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनचा विरोधक कशाप्रकारे प्रतिउत्तर देतील? हे लोकसभेच्या रणधुमाळीत पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


-Kishor K. Gaikwad

वाचा...







Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments