मुरबाड सिटी क्राइम : अवैध मटका, गुटका, जुगार विरोधातील भाजपा पदाधिकाऱ्याचे उपोषण तूर्तास स्थगित; कारवाईला मुहूर्त कधी? -Kishor Gaikwad


मुरबाड सिटी क्राइम : अवैध मटका, गुटका, जुगार विरोधातील भाजपा पदाधिकाऱ्याचे उपोषण तूर्तास स्थगित; कारवाईला मुहूर्त कधी?

-Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (किशोर गायकवाड) : मुरबाड शहरात बिनदिक्कत तथा बिनदास्तपणे सुरू असलेल्या मटका, गुटका व जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या पत्रावर कार्यवाही न झाल्याने भाजपा पदाधिकाऱ्याने थेट उपोषणाचे पत्र दिले असता उपोषणकर्त्याला उपोषणा पासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सदरचे उपोषण तूर्तास स्थगिती करण्यात आले असल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितले आहे.




  मुरबाड शहराचा मध्यभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ मधील मातानगर विभागात मटका, जुगार अड्डा, गुटखा असे अवैध व्यवसाय सुरू असल्याची लेखी तक्रार मातानगर रहिवासी व भाजपाचे मुरबाड शहर अध्यक्ष तथा राष्ट्रीय नाभिक संघटना महाराष्ट्र राज्याचे खजिनदार महेश रायकर यांनी दि. २८/०८/२०२३ रोजी मुरबाड पोलीस स्टेशनला दिली होती. 




  परंतु, सुमारे ८ महिन्यांहून अधिक कालावधी लोटून ही तिळमात्र कारवाई होत नसल्याने रायकर यांनी अखेर दि. १ मे रोजी उपोषणाचे पत्र दिले. सदर पत्रात स्थानिक नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते यांनी सुध्दा मुरबाड पोलिस स्टेशनला या अवैध धंद्यां विरोधात तक्रारी केल्याचे म्हंटले आहे. तसेच याप्रकरणी त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याबाबत सहजा सहजी न्याय मिळणार नसल्याची त्यांना खात्री झाल्याचे उल्लेखिले आहे. त्यामुळे दि. १२.मे रोजी सकाळी ११:०० वाजेपासून रायकर मुरबाड पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सदर पत्रात नमूद आहे.




  त्यानुषंगाने मुरबाड पोलीसांनी रायकर यांचे जबाब नोंदवून शहरातील तसेच इतर परिसरात अवैध चालणारे मटका, जुगार अड्डा, गुटका तसेच इतर अनैतिक धंदे बंद करून कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन देऊन रायकर यांना उपोषण करण्यापासून परावृत्त केल्याचे पोलिसांनी दिलेल्या लेखी पत्रात नमूद आहे. 




  शहरातील देवीची आळी येथे देखील जुगार सदृश प्रकार सुरू असल्याचे बोलले जात असून याच प्रभागात अगदी हाकेच्या अंतरावर मुरबाड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष मुकेश बबन विशे तथा माजी उपनगराध्यक्षा अर्चना मुकेश विशे या दाम्पत्याचे घर आहे. परंतु हे जुगाराचे अड्डे चालविणारे या उभयतांचे आप्तेष्ट असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्या ऐवजी याकामी त्यांना अभय मिळत असल्याची छुपी चर्चा आहे. तसेच हनुमान आळी परिसरात देखील जुगार अड्डा चालविला जात असल्याचे अंतर्गत कुजबुज आहे. तर मधल्या काळात तालुक्यात झालेल्या क्रिकेटच्या सामान्यांमध्ये देखील दिवसाढवळ्या जुगाराचे खेळ मांडले जात असल्याच्या अनेक तक्रारी हल्ली सुद्धा कानावर येत असतात.




  तर यानिमित्ताने मुरबाड शहरात ऑनलाइन लॉटरी, मटका, जुगार देखील जोमाने सुरू असल्याचे समोर आले आहे. शहरातील सावजिनक ठिकाणी, बाजापेठेत, शासकीय कार्यालयात गुटका खाऊन थुंकल्याचे डाग हमखास नजरेस पडत असतात. यातून तालुक्यात छुपा गुटका व्यापार तेजीत असल्याचे देखील उघड होते. त्यामुळे या सर्व बाबीं विरोधात मुरबाड पोलीस स्टेशनला (Murbad Police Station) नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर याबाबत नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...





















Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor Gaikwad Murbad

0 Comments