#Boycott : अन्यथा आम्ही लोकसभेला मतदान करणार नाही फणसोली ग्रामच्या महिलांची पाण्यासाठी फाईट [Kishor K Gaikwad]

मुरबाड पंचायत समिती समोर आंदोलन

#Boycott : अन्यथा आम्ही लोकसभेला मतदान करणार नाही


फणसोली ग्रामच्या महिलांची पाण्यासाठी फाईट

【Kishor K Gaikwad]

ठाणे/मुरबाड (दि.१८) : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुक्यातील फणसोली गावातील कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याने फणसोली गावच्या ग्रामस्थ महिलांनी पाण्यासाठी (बुधवार दि. १८ रोजी) मुरबाड पंचायत समितीच्या दारात ठिय्या मांडून घोषणाबाजी करीत आंदोलन केले.  


पंचायत समिती, मुरबाड

   सुमारे ७५० लोकसंख्या असलेल्या फणसोली गावापासून बारवी डॅम (Baravi Dam) हाकेच्या अंतरावर आहे. शिवाय कोळे-वडखळ व सुकाळवाडी या दोन बारवी प्रकल्प बाधित असलेल्या आदिवासी वस्त्यांचा समावेश देखील फणसोली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आहे. परंतु त्यांना स्वतंत्र पाणी योजना मंजूर असून त्यांच्या पाणी पुरवठा विहीरचे बारवी धरण बुडीत श्रेत्रात खोदकाम सुरू आहे. तर फणसोली जल जीवन योजनेमध्ये फणसोली, लोहार पाडा, कातकरी वस्ती यांचा समावेश आहे. त्यासाठी १ कोटी ११ लाख ६८ हजार २७० रुपयांची योजना पूर्ण असल्याचे दाखवून रक्कम काढल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. 




  त्यामुळे फणसोली ग्रामस्थ महिलांनी आज पंचायत समितीला (Panchayat Samiti, Murbad) घेराव घालून दारातच ठिय्या मांडला. यावेळी मोर्चेकरी महिला सोबत पाण्याचा हांडे व उपलब्ध करून दिला जाणारा पाणी बॉटलमध्ये घेऊन आले होते. पाण्याच्या हंड्यांना पूर्णपणे बुडाला चिखल चिटकून राहिलेला स्पष्ट दिसत असून बॉटलमधील पाणी अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त असल्याचे मोर्चेकरी महिलांनी दाखवून दिले. त्यामुळे तहान आद्यपही पाण्याच्या शोधात




  यावेळी मोर्चेकऱ्यांकडून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात जल जीवन योजने अंतर्गत योजना कार्यरत असतांना ही त्या योजनेच्या अंदाजपत्रकानुसार विहिरीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसून विहिरीचे खोदकाम नियमाप्रमाणे झालेले नसल्याचे म्हंटले आहे. कोरड्या विहिरीत तलावाचे पाणी ओतून गावाला पुरविले जाते. मात्र सदर पाण्याचा घाण वास येत असून ते अंघोळीसाठी देखील वापरण्या सारखे नसल्याचे नमूद आहे. त्यामुळे फणसोली गावात तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा सुरू करून सदर जल जीवन मिशन योजनेची चौकशी संबंधित ठेकेदार यांचेवर कारवाई करून गावात पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा दिला आहे. 





  या मोर्चाची दखल घेऊन जिल्हा परिषद उपविभाग मुरबाडचे ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांनी फणसोली गावाला दररोज दोन टँकर पुरविले जाणार असल्याचे पत्र दिले. तसेच योजनेच्या उदभव विहिरी बाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांचे मार्फत फेर सर्वेक्षण करून त्वरित निर्णय घेण्यात येईल व गावच्या गरजेचे नुसार टँकर सुरू ठेवण्यात येतील, असे पत्र नमूद केले आहे.


 -KISHOR K GAIKWAD

वाचा...








Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments