लोकसभा ट्विस्ट : अरेरे... सांबरे? एक फॉर्म अपक्ष तर एक फॉर्म काँग्रेसमधून भरला; कपिल पाटलांकडून लेटेस्ट माहिती... Kishor K Gaikwad


लोकसभा ट्विस्ट : अरेरे... सांबरे? एक फॉर्म अपक्ष तर एक फॉर्म काँग्रेसमधून भरला; कपिल पाटलांकडून लेटेस्ट माहिती... 

Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. २) : (किशोर गायकवाड) भिवंडी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मुरबाड तालुक्यातून सर्वाधिक लीड मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मुरबाड तालुका यांचे वतीने मुरबाडमधील सासणे येथे आज 'कार्यकर्ता संवाद मेळावा' आयोजित केला होता.


  याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइं (आ) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर, प्रमुख अतिथी तथा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, रिपाइं पक्षाचे राष्ट्रीय संघटक सचिव सुरेशदादा बारसिंगे, ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष संजय गायकवाड, रिपाइं नेते भगवान पवार, अनंता अहिरे, अनिल धनगर, जिल्हा सचिव बाळासाहेब भालेराव, भाजपा जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहपे, तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजप नेते दीपक खाटेघरे, श्रीकांत धुमाळ, नारायण गोंधळी, किसन अनंता कथोरे, आदी मान्यवरां समवेत विविध पदाधिकारी आसनस्थ होते. तर या मेळाव्याचे नियोजन मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा खोळंबे व शहर अध्यक्ष कैलास देसले या स्वागत अध्यक्ष टीमने केले.



 यावेळी व्यासपीठावरून उमेदवार कपिल पाटील यांनी विजयाचा आशावाद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठवले साहेबांना निवडणूक न लढविता राजसभेवर घेतले. त्यामुळे यावेळी देखील आपण मला लोकसभेमध्ये पाठवा, म्हणजे आठवले साहेब अपोआप मंत्री होतील. २०४७ ला भारत आपल्याला विकसित करायचे आहे, असे विविधांगी मुद्दे त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. 



  जसा मूर्तिकार गणपती बनवतो तसा बाबासाहेबांनी संविधान बनवला, मात्र बाबासाहेबांच्या अनुयायांची मते मागण्याचा अधिकार काँग्रेसला नसल्याचा राजकीय आक्षेप त्यांनी भाषणातून नोंदविला. तर भाजपा संविधान बदलू पाहतोय, या मुद्द्याचे त्यांनी खंडन केले. अंतिमतः २० तारखेला आपण न चुकता कमळाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.



व्यासपीठावरून खाली उतरल्यावर पत्रकारांशी बोलतांना कपिल पाटीलांनी सांबरेंच्या उमेदवारी अर्जाबाबत ट्विस्ट आणणारी प्रतिक्रिया दिली. सांबरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष भरलेल्या उमेदवारी अर्जा सोबत काँग्रेसमधून देखील एक अर्ज दाखल केला असल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्यामुळे लढत तिरंगी होते की दुरंगी, हे लवकरच समजेल, असा टोला विरोधकांना लगावला.



  मात्र या संवाद मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किसन कथोरे व त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते यांची पुन्हा एकदा कपिल पाटलांच्या कार्यक्रमाला दांडी दिसून आल्याने कथोरेंच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे नेमकं एमएलए - एमपी मनोमिलन यशस्वी झालाय की क्लेश शिल्लक आहे? याबाबत चर्चा रंगत आहे.



(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...













Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments