अनलिमिटेड भिमजल्लोष : महामानवाच्या आजोळी भीमजन्मोत्सवाचा गोडवा; विविध उपक्रमांची उत्साहाला जोड

BhimJayanti in Murbad

अनलिमिटेड भिमजल्लोष : महामानवाच्या आजोळी भिमजन्मोत्सवाचा गोडवा; विविध उपक्रमांची उत्साहाला जोड 

Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या आजोळी अर्थात मुरबाड तालुक्यात (Murbad Taluka) समस्त एप्रिल मास हा भीमजन्मोत्सवात व्यस्त असलेला नजरेस पडत असतो. दिनांक १४ एप्रिलच्या पूर्वसंध्येपासून तालुक्यात भीमजन्मोत्सवाचा अनलिमिटेड जल्लोष सुरू होतो ते थेट महिनाभर हा चैतन्यमय वातावरण अनुभवायला मिळत असतो. तालुक्यात विविध ठिकाणी महिनाभर विविध उपक्रम, कार्यक्रम राबवून हा आनंद साजरा केला जात असतो. यंदाही मोठ्या उत्साहात भीमजन्मोत्सव साजरा करण्यात आला. 


 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून दिवंगत माता जनाबाई रघुनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ चिरड येथील डॉ. मारुती आर गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाला तसेच बदलापूर येथील सोनावळी विहाराला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती धम्मदान स्वरूपात दिल्या. या धम्मकार्यासाठी गायकवाड कुटुंबियांना कौतुक होत आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दल आणि तालुक्यातील अन्य समाज बांधव उपस्थित होते. 



युवा भीमसैनिकांकडून मुरबाड शहरात सालाबादप्रमाणे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ भिम अनुयायी मित्र परिवार यांस कडून स्वयंप्रेरणेने खीर व पाणीचे वाटप करण्यात आले. यावेळी महामानवास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या शेकडो भीमसैनिकांनी पाणी तसेच खीरचा आस्वाद घेतला. 
१३३ व्या भीमजयंती निमित्ताने आंबेडकरी कार्यकर्ते आण्णा साळवे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते रुग्णवाहिणीचे लोकार्पण केले.


डॉ. बाबासाहेबआंबेडकर स्मारका समोर ताक तसेच गुलाबजाम वाटप करतांना भीमसैनिक.



समता सामाजिक फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष शंकर करडे यांनी पेन व मिठाईचे वाटप केले.

तीन हात नाका येथील पथभाजी विक्रेते शिवाजी चन्ने व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सरबतचे वाटप करण्यात आले.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बाबासाहेबांचे विचार पसरवण्यासाठी भिम अनुयायी काशिनाथ अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.



तीन हात नाका येथील टेम्पो चालक संघटना, मुरबाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिष्ठांन्नाचे वाटप केले. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले.


जयंती दिनी रिक्षा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.



तालुक्यातील खापरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधनकार व्याख्याते शिवश्री अ‍ॅड. रोशन पाटील यांचा व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


तालुक्यातील न्हावे येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी केली.


सिद्धार्थ युवकमित्रमंडळ यांचे तर्फे सालाबादप्रमाणे मुरबाड नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच दि. १२ एप्रिल पासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे 'वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय' येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन करतांना प्राचार्य डॉ चंद्रमणी मोहिते, शिक्षक बी. डी. लोहार, भालेराव सर अन्य शिक्षण वृंद...



लोकनेते दिलीप चंदने सेवाभावी संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भीमकोरेगाव आयोगाचे अ‍ॅड. किरण चन्ने व जिजाऊ संस्थेच्या मोनिका पानवे उपस्थित होत्या. तसेच आंबेडकरी चळवळीतील युवा प्रबोधनकार, गायक कुणाल वराळे यांचे भिमगीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



रिपाइं (आ) पक्षातर्फे शहरातील तीन हात नाका येथे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य अभिवादक म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाकडून शहरातील खुले नाट्यगृह येथे कडूताई खरात यांचा शिव-भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळाली.


तालुक्यातील आंबेले (गडगे) येथे भीमजयंती साजरी



मौजे वैशाखरे येथे ग्रामस्थ भीमसैनिकांकडून भीमजयंती साजरी




सरळगाव येथे बॉस ग्रुपकडून भीमजयंतीचे भव्य आयोजन. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार तथा व्याख्याते संदीप कदम यांच्या व्याख्यानाने उपस्थित अनुयायी मंत्रमुग्ध झाले.



मौजे खेड येथे भव्य भीमजन्मोत्सव साजरा झाला.



मौजे कोलठण येथे ग्रामस्थांनी भिम जयंती साजरी केली.


तालुक्यातील टेंभरे (बु.) येथे सिद्धार्थ नवयुवक मित्रमंडळ यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून, विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांसोबत भिमजयंती साजरी केली.


-Kishor K Gaikwad

वाचा...









Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

2 Comments

  1. Dr. M. R. Gaikwad, Mayur Diagnostic Centre & Polyclinic, Murbad.April 24, 2024 at 3:20 PM

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्ताने मुरबाड तालुक्यातील विविध ठिकाणी साजऱ्या केलेल्या भिम जयंती दिनाचे अवलोकन आपण अगदी योग्य शब्दात या बातमीद्वारे मांडून प्रसिद्धी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद....
    किशोर गायकवाड आपणास मनःपूर्वक धन्यवाद...आभार...

    ReplyDelete