हुर्रे! : आता मुरबाडच्या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा झाली सोपी; वाढदिवसानिमित्त सुभाष पवार यांचेकडून मोबाईलमध्ये डिजिटल अ‍ॅप..! Kishor K Gaikwad


हुर्रे! : आता मुरबाडच्या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा झाली सोपी; वाढदिवसानिमित्त सुभाष पवार यांचेकडून मोबाईलमध्ये डिजिटल अ‍ॅप भेट..!

Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. १५) : (किशोर गायकवाड) ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवळे येथील त्यांच्या जनसेवा प्रतिष्ठान कार्यालयाच्या पटांगणात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत 'डिजिटल स्टडी' (Digital Study) अ‍ॅपचे लॉचिंग करण्यात आले. 



 तत्पूर्वी जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यालयात सुभाष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन व केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी सुभाष पवार (Subhash Pawar) यांचे पिता माजी आमदार गोटीरामभाऊ पवार (ex-MLA Gotirambhau Pawar) उपस्थित होते. आपल्या स्तुती सुमनांतून त्यांनी सुभाष पवार यांना भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. पित्याकडून चिरंजीवाला शुभेच्छा देतांनाच्या प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. तर सुभाषदादा पवार आमदार व्हावे, असा आशावाद पांडुरंग कोर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख प्रकाश पवार व अ‍ॅड. अशोक फनाडे यांनी देखील आपल्या भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या.





नेमकं काय आहे या अ‍ॅपची सुविधा? 


  केवळ मुरबाड तालुक्यातील इयत्ता १० वी च्या विध्यार्थ्यांना 'आयडियल स्टडी' नावाचा अ‍ॅप देण्यात आला असून हे अ‍ॅप मोबाईल फोनच्या गूगल प्ले स्टोअरमध्ये (Google Play Store) उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये इयत्ता १० वीच्या सर्व विषयांचे पाठ्यपुस्तक, प्रत्येक धड्याच्या नोट्स, त्याच प्रमाणे धड्याखाली जो स्वाध्याय आहे, तो व्यवस्थित उत्तरासह सोडवून दिलेला आहे.  याव्यतिरिक्त विध्यार्थ्यांना जे महत्त्वाचे संभाव्य प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात, ते देखील या भागांमध्ये सोडवून दिलेले आहेत. विध्यार्थ्यांना स्वतःला सोडविण्यासाठी प्रत्येक धड्यावर २० ते ४० गुणांची एक कृतीपत्रिका दिलेली आहे. त्याशिवाय त्यांची दहावीची तयारी कितपत झाली आहे, हे तपासण्यासाठी विध्यार्थ्यांना एम.सी.क्यू. (Multiple Choice Questions) दिलेले आहेत. मुलांना व्हिडिओद्वारे शिक्षण दिल्याने लवकर समजते, हे ओळखून या अ‍ॅपमध्ये प्रत्येक धड्याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. भाषा विषयासाठी व्याकरण आणि उपयोजित लेखन दिलेले आहे. सरावासाठी जानेवारी पासून तीन सराव कृतीपत्रिका आणि एक आदर्श उत्तरपत्रिका या अ‍ॅपद्वारे मिळतील. तसेच परीक्षेनंतर विध्यार्थ्यांच्या करिअरच्या योग्य निवडीसाठी करिअर मार्गदर्शनची सुविधा देखील मिळणार आहे. 


Digital Study App in Google Play Store


  हे अ‍ॅप अस्तित्वात आणण्यासाठी सुमारे अडीच वर्षे खर्ची लागली असून सुमारे १२० शिक्षकांनी या अ‍ॅपच्या निर्मितीसाठी योगदान दिले असल्याची माहिती आयडियल स्टडी अ‍ॅपचे सॉफ्टवेअर डिझायनर अमोल कामत यांनी दिली. त्यामुळे आता मुरबाडच्या दहावीच्या विध्यार्थ्यांचा गुणांक निश्चितपणे वाढेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.


वाचा...








Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments