THEFT : 'या' गावातून खाटिकाच्या अकरा बकऱ्या गेल्या चोरीला..!
मुरबाड (दि. ४) : (किशोर गायकवाड) शहरातील तीन हात नाका येथे मटणाचा व्यवसाय करणाऱ्या खाटिकाच्या गोठ्यातून तब्बल अकरा बकऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) शिवळे (Shivale) येथील रहिवासी मटण विक्रेते विनायक दत्तात्रेय जांभळे हे बेल्हे येथील बाजारातून बकरे आणून मुरबाड शहरातील तीन हात नाका ( Murbad Teen Haat Naka) येथील मटण दुकानात विक्री करत असतात. बकरा मंडईमधून आणलेले बकरे जांभळे हे आपल्या राहत्या घरा जवळील बेड्यामध्ये टाळा लावून ठेवत असतात.
बुधवार दि. ०३/०४/२०२४ रोजी नेहमीप्रमाणे जांभळे यांनी बाजारातून आणलेली बकरे आपल्या बेड्यात टाळा लावून ठेवली होती. मात्र सकाळी सदर बेड्याचा टाळा तोडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला आणि बेड्यातील तब्बल अकरा बकऱ्या गायब झालेल्या होत्या. याबाबत जांभळे यांनी मुरबाड पोलीस स्टेशनला (Murbad Police Station) लेखी अर्ज सादर केला आहे. यामध्ये सर्व बकऱ्यांच्या कमरेला निळा रंग लावला असून ७ बकरे लाल, २ सफेद व २ काली असे वर्णन नमूद केले आहे. या चोरीमुळे जांभळे यांचे सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले असल्याचे सांगत आहेत.
यापूर्वी ही शहरात चिकन विक्रेत्यांच्या कोंबड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून या छोट्या दुकानादारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सदर बकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुरबाड पोलिसांना कितपत यश येते? याकडे लक्ष वेधले आहे.
-Kishor K. Gaikwad
(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)
0 Comments