पडद्यामागे..: इरिगेशनच्या तलावात तरुणाचा मृत्यू; जलसंपदा अधिकाऱ्यांनी केले हात वर? प्रेत सापडलेल्या डॅमचे पाणी शहरवासीयांच्या नळाला..! वाचा, विचार करायला लावणारी बातमी... -Kishor Gaikwad


#पडद्यामागे..: इरिगेशनच्या तलावात तरुणाचा मृत्यू; जलसंपदा अधिकाऱ्यांनी केले हात वर? प्रेत सापडलेल्या डॅमचे पाणी शहरवासीयांच्या नळाला...! वाचा, विचार करायला लावणारी बातमी...

-Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. ०१) : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुक्यातील धानिवली गावच्या युवकाचा मृतदेह शिरवली येथील पाटबंधारे उपविभागाच्या धरणात आढळून आल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या घटनेतून पडद्याआड निर्माण झालेल्या विविध शंकांमुळे मुरबाडकरांच्या चिंतेत भर पडणार असल्याचे संभाव्य चित्र पाहायला मिळणार आहे.


Shiravli Dam, Murbad


 वाढत्या उकड्याने नागरिक पुरता हैराण झाले असून अंगाची होणारी लाहीलाही शमविण्यासाठी त्रस्त मंडळी पाण्याच्या शोधार्थ पाणवठ्यांकडे धाव घेत असतात. अशातच पाण-स्थळांच्या शोधातील शहरी तरुणाई बहुदा रिसॉर्टला पसंती देतात. मात्र ग्रामीण भागात या चैनीच्या बाबींचा अभाव असल्याने हौशी मंडळी नदी, ओढे, डॅम अशा नैसर्गिक स्रोतांचा पर्याय निवडतात. मुळात रिसॉर्ट सारख्या कृत्रिम सुखसोयी ग्रामीण भागातील नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या नसल्याने ते नैसर्गिक सोर्सवर आपला समाधान शोधतात. परंतु, अशा ठिकाणी जाणे अधिक धोक्याचे असून अनेकदा हे जीवावर देखील बेतते. याचीच प्रचिती देणारी ही सत्य घटना म्हणावी लागेल. 




 याप्रकरणी सखोल विचार केल्यास अनेक पैलू हाताला लागू शकतात. अत्यंत असुरक्षित पाणी मुरबाडकरांच्या नळाला येत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. याबाबत कोणीही आवाज उठविण्यासाठी पुढे येत नाही. नुकताच जिल्ह्यात लोकसभा निवडणूकांची मतदान प्रक्रिया पार पडली असून विधानसभा देखील तोंडावर आहेत. अशात नागरिकांना या गोष्टी प्रकर्षाने लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.


Irrigation Department, Murbad



पाटबंधारे विभाग दोषी? : शिरवली डॅमच्या उडघ्या विस्तृत पाणलोट क्षेत्रावर आवश्यक तेवढी अद्यापही सुरक्षिततेची उपयोजना दिसून येत नाही. परिसरात एकही सुरक्षारक्षक नजरेस पडत नाही किंवा सुचनेचे फलक आवश्यकते नुसार आढळून येत नाहीत. डॅमचा अरुंद बांध चक्क फार्म हाऊस आणि वाहतूक-रहदारीसाठी वापरला जात असल्याचे बोलत आहेत. याच डॅममधून मुरबाड शहराला दैनंदिन पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. असे असताना ही मागील वर्षी शासनाचे लाखों रुपये खर्ची लागलेल्या शिरवली धरणाचा असुरक्षितपणा चव्हाट्यावर आला आहे. संरक्षणा अभावी कोणीही सहज डॅमच्या पाणी पात्रात प्रवेश घेत असतो, त्यातून अशा घटना समोर येत असतात. याबाबत डॅमची मालकी असणारे पाटबंधारे उपविभाग देखील दोषी असल्याचे आरोप होत आहेत. परंतु, उपअभियंता सुनिल दांडेकर अशा घटना कायदा सुव्यवस्थेच्या भागात मोडत असल्याची सबब मांडून अप्रत्यक्षपणे सरळ हात वर करून याचा ठपका जलसंपदा विभागाच्या सुस्त व दुर्लक्षितपणाचे बळी ठरलेल्या नागरिकांवर ठेवत आहेत. त्यामुळे एवढं मात्र नक्की, तालुक्यातील धरणे नागरिकांसाठी सुरक्षित राहिलेली नाही.


Water Filtration Plant, Murbad


मुरबाड शहराचा पाणीपुरवठा : मुरबाड शहराला याच धरणातून दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी याच शिरवली धरणात लाखों रुपये खर्चून डागडुजीचे काम करण्यात आले होते. दरम्यान, मुरबाड शहरवासीयांवर ऐन उन्हाळ्यात अनपेक्षितपणे भीषण पाणीटंचाई लादण्यात आली होती. यावर मात करण्यासाठी तत्कालीन भाजपाचे नगराध्यक्ष राम दुधाळे यांनी फिल्टरेशनची प्रक्रिया वगळून सदर पाईपलाईन थेट बागेश्वरी धरणातील पाणीसाठ्यात टाकून मुरबाड शहरवायींच्या नळाला अशुद्ध, दुर्गंधीयुक्त, चिखलमय पाणी सोडल्याचे ऐकीवात आहे. मात्र याबाबत अद्यापही मुरबाडकरांना कल्पना व जाग नाही. या कालावधीत मुरबाड शहरात (Murbad City) मोठी रोगराईची संभाव्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, सत्तारुढ गुंडशाही व हुकमी सत्ते विरोधात कोणीही आवाज उठविण्यात पुढाकार घेतला नाही. तर आता तरुणाचे प्रेत सापडलेल्या धरणातील पाणी मुरबाडकरांच्या नळाला पिण्यासाठी येत आहे. याबाबत नगरपंचायत कोट्यवधी रुपयांच्या फिल्टरेशन प्लँटचा हवाला देईल, यात शंका नाही?


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...































Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments