VidhanSabha Updates : मुरबाडमधून ३ अर्ज मागे तर ९ उमेदवार रिंगणात -Kishor K Gaikwad


VidhanSabha Updates : मुरबाडमधून ३ अर्ज मागे तर ९ उमेदवार रिंगणात

-Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. ४) : (किशोर गायकवाड) अवघ्या ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुरबाड विधानसभा निवडणुकीतून आज ३ उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित ९ उमेदवार लढतीसाठी तटस्थ राहिल्याने मुरबाडमध्ये निवडणुकीचे खरेखुरे चित्र स्पष्ट झाले आहे.


 निवडणूक आयोगाद्वारा घोषित राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुक प्रक्रियेत आज (दि. ४) उमेदवारांची माघार घेण्याची अंतिम मुदत असतांना मुरबाड विधानसभेत सानिका शैलेश वडनेरे, सुरेश बबन जमदारे व गोटीराम पदू पवार या अपक्ष उमेदवारांनी आज निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात आता पुढील ९ उमेदवार लढतीसाठी तटस्थ आहेत.



1) किसन शंकर कथोरे (भाजप), 2) सुभाष गोटीराम पवार (राष्ट्रवादी - SP), 3) संगीता मोहन चेंदवनकर (मनसे), 4) प्राजक्ता निलेश येलवे (बहुजन मुक्ती पार्टी), 5) सागर जयराम अहिरे (निर्भय महाराष्ट्र पार्टी), 6) शैलेश केसरीनाथ वडनेरे (अपक्ष : निशाणी - Batsman/फलंदाज) 7) शरद लक्ष्मण पाटील (अपक्ष), 8) रविंद्र जैतु जाधव (अपक्ष), 9) सुभाष शांताराम पवार (अपक्ष)

उमेदवारांची नावे व निशाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

-Kishor K. Gaikwad, Murbad

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-किशोर गायकवाड, मुरबाड

वाचा...




















Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments