आ. कथोरें विरोधात मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल
पहा VIDEO : आमदार किसन कथोरेंची धमकी कॅमेऱ्यात कैद; यावर काय म्हणाले माजी सभापती?
आमदार किसन कथोरे, मुरबाड
मुरबाड (किशोर गायकवाड) : (दि. ८) बारवी डॅम रस्त्याच्या नियोजित भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आमदार किसन कथोरे यांनी तेथे उपस्थित मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून याबाबत मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रारी अर्ज देण्यात आले आहे.
मुरबाड विधानसभेचे भाजपा पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुरबाड बारवी डॅम रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवेदन देण्यासाठी उभे असलेल्या बारवी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांजवळ आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांचा ताफा थांबला असता त्याठिकाणी टोले पान सेंटर जवळ उभे असलेल्या मुरबाड पंचायत समितीचे भाजपा पक्षाचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांचेकडे हातवारे करून पोलीस प्रशासनासमोर शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप सदर पत्रातून धुमाळ यांनी केला आहे. तसेच यामुळे ते भयभीत झाले असून त्यांच्या जीवीतास काही बरेवाईट झाल्यास यास सर्वस्वी जबाबदार आ. किसन कथोरे असतील असे पत्रात म्हंटले आहे. तरयाप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ देखील सोशियल मीडियावर व्हायरल होत असून याप्रकरणी पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
श्रीकांत धुमाळ, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती
0 Comments