Murbad Vidhansabha : महायुतीची भूमिका ठरतेय सुभाष पवारांना आधारकार्ड? नक्की कोण कोणासाठी काम करतोय हेच कळेना? पत्रकार परिषदेनंतर बदलापूरातून तातडीच्या सूचना व्हायरल? वाचा...
-Kishor K. Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. २३) : (किशोर गायकवाड) मुरबाड विधानसभेचे दीर्घकालीन भाजपा आमदार किसन कथोरेंना शह देण्यासाठी मुरबाडचे माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांचे चिरंजीव सुभाष पवार राष्ट्रवादीची तुतारी घेऊन मैदानात उतरले असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यासाठी त्यांनी काल शिवळे येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
पक्ष प्रवेशानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देतांना सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमने उधळीत केवळ निवडणुक लढविण्यासाठी ते राष्ट्रवादी पक्षात आल्याचे स्पष्टपणे कबूल केले. शिवाय, बदलापूरच्या शिंदे गटातील वामन म्हात्रेंचे मैत्रीत्व देखील मान्य करून कपिल पाटीलांचा आधारही प्रत्यक्षपणे नाकारला नाही. त्यामुळे यासर्वांतून मोठा संभ्रम निर्माण झाला असून मुरबाड विधानसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चेचे पीक आलेलं पाहायला मिळत आहे.
तर मुरबाड विधानसभा मतदारसंघातील सोशियल मीडियावर बदलापूरमधून एक धक्कादायक राजकीय मॅसेज व्हायरल होत असून मतदारसंघ युतीमध्ये भाजपा पक्ष युतीचा धर्म पाळत असल्याचा आरोप त्यात केला आहे. तसेच पक्ष वाढीस बदलापूर शहरांमध्ये नेहमी अडथळा निर्माण करतात व बऱ्याचशा नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये त्रास देण्याचे काम चालू आहे, भाजपाने बंडखोर उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली आहे, तरी भावनावश होऊन कोणत्याही भाजपाच्या मिटींगला न जाण्याचे आवाहन सदर मॅसेजमधून शिवसेना पक्षांतर्गत केले असून दि. ५ नोव्हेंबर रोजी याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा उल्लेख केला आहे.
यासर्वांतून सुभाष पवार यांच्या उमेदवारीचा रथ विजयाकडे नेण्यासाठी महाविकास आघाडी पेक्षा महायुतीच्या नेत्यांचा अप्रत्यक्ष सहकार्य अधिक असल्याचा चित्र सद्या मुरबाड मतदारसंघात भासत आहे. त्यामुळे हा नियोजित फंडा असल्याचा सिक्रेट गोंगाट सुरू आहे.
-किशोर गायकवाड, मुरबाड
0 Comments