COUNTDOWN : कथोरेंचा विजयी रथ रोखण्यासाठी पवारांची फुक तुतारीपर्यंत पोहचेना? कपिल पाटील आणि बाळ्यामामांची भूमिका ओपन सिक्रेट? दोहोंचे उमेदवार विरुद्ध पक्षात? मुरबाडमध्ये आज राजकीय स्फोट..? वाचून काढा... -Kishor K. Gaikwad

 


COUNTDOWN : कथोरेंचा विजयी रथ रोखण्यासाठी पवारांची फुक तुतारीपर्यंत पोहचेना? कपिल पाटील आणि बाळ्यामामांची भूमिका ओपन सिक्रेट? दोहोंचे उमेदवार विरुद्ध पक्षात? मुरबाडमध्ये आज राजकीय स्फोट..? वाचून काढा...

-Kishor K. Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. २०) : (किशोर गायकवाड) अखेर राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली असून इच्छुक उमेदवारांना येत्या २२ ते २९ ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. याबाबत नुकताच पत्रकार परिषद घेऊन मुरबाड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकारांना अधिकृत माहिती दिली आहे. तर निवडणूकीचे बिगुल वाजल्याने इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे.

 यंदाच्या मुरबाड विधानसभा निवडणुकीत भाजपातून किसन कथोरे व सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे नेते सुभाष पवार पक्षांतर करून आमनेसामने येणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे. असे असताना या दोन्ही उमेदवारांच्या लढतीत आजी-माजी खासदार यांच्या भूमिका निरीक्षण करण्याजोगे ठरत आहेत.


 भाजप पक्षाचे दोन टर्म आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (MP Balyamama) यांचे निकटवर्तीय असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. दोघेही विरुद्ध पक्षात असतांना देखील अनेकदा त्यांचे एकाच बॅनरवर फोटो पाहायला मिळत असतात. शिवाय आपसी वैमनस्यातून स्वपक्षीय भाजपा उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांना लोकसभेत पराभूत करण्यासाठी आ. कथोरे यांनी निवडणूकी दरम्यान आभासी काम केल्याचा आरोप जैसेथे आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी (एस.पी.) पक्षाचे विरोधी उमेदवार खा. सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (Balyamama) यांनाही अदृष्य मदत केल्याचा श्रेय त्यांना दिला जात आहे. या सर्वांमुळे मुरबाडचा राजकीय समीकरण दिशाहीन झाल्याचे चित्र सध्या अनुभवायला मिळत असून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मतदार राजा पुरता संभ्रमात पडलेला दिसून येत आहे.


 नुकताच भाजपा निष्ठवंत कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेल्या कपिल पाटीलांना लोकसभेला मुरबाडमधून मिळालेल्या मतांचा श्रेय सद्यस्थितीला शिंदे गटात कार्यरत असलेले सुभाष पवार यांना दिले जात आहे. मात्र 'पवार बॅक टू पवार राष्ट्रवादी' असा गोंगाट कोणत्याही प्रसंगी सत्य ठरण्याची संभावना असल्याने लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी नाव न घेता कथोरेंना दिलेल्या 'करेक्ट कार्यक्रम' इशाऱ्याच्या अंमलबजावणीची रणनीती कशाप्रकारे आखली आहे? याबाबत सर्वत्र गंभीर चर्चा सुरू आहे. त्यामुळे हितशत्रू मानले जाणारे स्वपक्षीय उमेदवार किसन कथोरे की लोकसभेला मतांच्या गोळाबेरीजेत मोठ्या आशेने धडपड केलेले पक्षविरोधी उमेदवारमित्र सुभाष पवार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.


 अर्थातच, दोन्हीही आजी-माजी खासदार या निवडणुकीत पक्षधर्म बासनात गुंडाळून विरोधी पक्षातील आपापल्या मर्जीच्या उमेदवारांना कशा चलाखीने मदत करतात? याबाबत मुरबाड मतदारसंघातील कुतूहल नाक्या-नाक्यांवर ऐकायला मिळत आहे.

 -किशोर गायकवाड, मुरबाड







Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments