Murbad Vidhansabha : फायनल उमेदवार १६ आणि अर्ज २०; सेफ्टी प्रिकौशन्स म्हणून कथोरेंचे ३ अर्ज तर मुलाला बॅक अप म्हणून गोटीराम पवारांचे २ अर्ज, वाचा मुरबाड विधानसभेतील उमेदवारांची पक्ष व तारखेनिहाय यादी..!
-Kishor K. Gaikwad, Murbad
ठाणे/मुरबाड (दि. २९) : (किशोर गायकवाड) भारत निवडणूक आयोगाद्वारा घोषित राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मंगळवारी (दि. २९) नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत मुरबाडमध्ये एकूण १६ उमेदवारांचे २० नामांकन अर्ज दाखल झाले असून याबाबतचा अहवाल।मुरबाड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी अंजली पवार यांनी जिल्हा निवडणूक आयोगाला सादर केला आहे.
मात्र आजच्या (दि. ३०) छाननी प्रक्रियेतून बाद होणाऱ्या नामांकन अर्जांची संख्या तसेच दि. ४ नोव्हेंबर रोजी माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या वजा करून उर्वरित उमेदवार निवडणूकीच्या मैदानात लढतीसाठी पात्र ठरणार आहेत. तर नामांकन दाखल तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत दाखल उमेदवारी अर्जांचा तपशील पुढीलप्रमाणे...
दि. २२/१०/२०२४
1) सुरेश बबन जमदरे (अपक्ष)
दि. २३/१०/२०२४
निरंक
दि. २४/१०/२०२४
1) किसन शंकर कथोरे (भारतीय जनता पार्टी)
2) किसन शंकर कथोरे (भारतीय जनता पार्टी)
3) किसन शंकर कथोरे (भारतीय जनता पार्टी)
दि. २५/१०/२०२४
1) शरद लक्ष्मण पाटील (अपक्ष)
दि. २६/१०/२०२४
निरंक
दि. २७/१०/२०२४
निरंक
दि. २८/१०/२०१४
1) सुभाष गोटीराम पवार (राष्ट्रवादी काँग्रेस एस. पी.)
2) सुभाष गोटीराम पवार (राष्ट्रवादी काँग्रेस एस. पी.)
3) प्राजक्ता निलेश येलवे (बहुजन मुक्ती पार्टी)
दि. २९/१०/२०२४
1) सागर जयराम अहिरे (निर्भय महाराष्ट्र पार्टी)
2) शैलेश केसरीनाथ वडनेरे (अपक्ष)
3) सानिका शैलेश वडनेरे (अपक्ष)
4) गोटीराम पदू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस एस. पी.)
5) गोटीराम पदू पवार (अपक्ष)
6) संगीता मोहन चेंदवनकर (म.न.से.)
7) रविंद्र जैतु जाधव (अपक्ष)
8) विठ्ठल काशिनाथ किणीकर (अपक्ष)
9) सुभाष शांताराम पवार (अपक्ष)
10) हनुमान हरी पोकळा (अपक्ष)
11) सोनम नरेश गायकवाड (वंचित बहुजन आघाडी)
12) नारायण लक्ष्मण जाधव (अपक्ष)
0 Comments