MURBAD ELECTION UPDATED : वडनेरेंचा अर्ज मागे तर गोटीराम पवारांसह छाननीमध्ये 'हे' चार उमेदवार बाद; वैध १४ नामांकनातील ११ उमेदवार लढतीसाठी पात्र, पहा यादी...
-Kishor K. Gaikwad, Murbad
ठाणे/मुरबाड (दि. ३०) : (किशोर गायकवाड) मुरबाड विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे काल पर्यंत सादर करण्यात आलेल्या एकूण १६ उमेदवारांच्या २० नामांकन अर्जांवरील आज छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात ४ उमेदवारांचे नामांकन छाननी अंती अवैध ठरविण्यात आले असून अपक्ष उमेदवार सानिका शैलेश वडनेरे यांनी देखील आज पात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. त्यानुसार आता मुरबाड विधानसभा निवडणूकीच्या मैदानात एकूण १४ वैध नामांकनातून ११ उमेदवार लढतीस पात्र ठरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सुभाष गोटीराम पवार (Subhash Pawar) यांचा अर्ज वैध ठरल्याने गोटीराम पदू पवार यांचा पक्षातील पर्यायी अर्ज अवैध ठरला आहे. मात्र दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघार दिनी सुभाष पवार यांनी आपला पक्षातील अर्ज माघार घेतल्यास गोटीराम पदू पवार हे राष्ट्रवादी (एस.पी.) पक्षातील वैध उमेदवार ठरतील अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुरबाडचे तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली.
त्यानुसार गोटीराम पदू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), सोनम नरेश गायकवाड (वं.ब.आ.), विठ्ठल काशिनाथ किणीकर (अपक्ष), हनुमान हरी पोकळा (अपक्ष) व नारायण लक्ष्मण जाधव (अपक्ष) अशी नामांकन अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे असून पुढील लढतीसाठी किसन शंकर कथोरे (भाजप), सुभाष गोटीराम पवार (राष्ट्रवादी - SP), गोटीराम पदू पवार (अपक्ष), संगीता मोहन चेंदवनकर (मनसे), प्राजक्ता निलेश येलवे (बहुजन मुक्ती पार्टी), सागर जयराम अहिरे (निर्भय महाराष्ट्र पार्टी), सुरेश बबन जमदरे (अपक्ष), शरद लक्ष्मण पाटील (अपक्ष), शैलेश केसरीनाथ वडनेरे (अपक्ष), रविंद्र जैतु जाधव (अपक्ष), सुभाष शांताराम पवार (अपक्ष) हे वैध ठरले आहेत.
तर दि. ४ नोव्हेंबर रोजी यातील काही उमेदवार माघार घेणार असल्याची शक्यता असून तेव्हाच मूळ निवडणुकीचा वातावरण सुस्पष्ट होईल, असे बोलले जात आहे.
0 Comments