...तरच कथोरेंना मंत्रिपद, विनोद तावडेंनी दिला शब्द मात्र कपिल पाटीलांचा विसर पण म्हात्रेंच्या अनुपस्थितीवर म्हणाले... उद्धव ठाकरे, राऊतांवर ही टीका; शक्ती प्रदर्शनातून कथोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल; पाटील, म्हात्रे गैरहजर..! -Kishor K. Gaikwad

BJP Candidate Kisan Kathore

...तरच कथोरेंना मंत्रिपद, विनोद तावडेंनी दिला शब्द मात्र कपिल पाटीलांचा विसर पण म्हात्रेंच्या अनुपस्थितीवर म्हणाले... उद्धव ठाकरे, राऊतांवर ही टीका; शक्ती प्रदर्शनातून कथोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल; पाटील, म्हात्रे गैरहजर..!


-Kishor K. Gaikwad

ठाणे/मुरबाड विधानसभा (दि. २४) : (किशोर गायकवाड) गेले दोन दशक विधानसभेचे आमदार असलेले किसन कथोरे  यांनी आज पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला असून तत्पूर्वी सकाळी मुरबाड शहरातील (Murbad City) छत्रपती संभाजीनगरपासून भव्य रॅली काढून श्रीराम मंदिर, झेंडा नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती ते संतोषीमाता मंदिर मैदानातील सभेच्या ठिकाणी शक्तिप्रदर्शन करीत सांगता केली.


Vinod Tawade In Murbad

 यावेळी व्यापीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, मध्यप्रदेशच्या जनरल सेक्रेटरी खा. कविता पाटीदार (Kavita Patidar) तसेच शिवसेना नेते एकनाथ शेलार, राष्ट्रवादी (AP) नेते  प्रमोद हिंदुराव, कोकण शिक्षक मतदारसंघ ज्ञानेश्वर म्हात्रे, टीडीसीसी बँक संचालक राजेश पाटील, राम पातकर, साकीब गोरे सह मोठ्यासंख्येने महायुती पदाधिकारी उपस्थित होते. मात्र भिवंडी लोकसभेचे माजी खा. कपिल पाटील (Kapil Patil) तसेच बदलापूरचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे वामन म्हात्रे (Vaman Mhatre) यांची गैरहजेरी दिसून आली.


MLA Dnyaneshwar Mhatre

 यावेळी विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी मुरबाड मतदारसंघातून सव्वा दोन लाखांच्यावर आघाडी मागणी करून विरोधकाचे डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी कार्यकर्ते यांचेवर सोपविली आणि तेव्हाच उमेदवार कथोरेंना मंत्रीपद दिला जाईल, असे आश्वासन आपल्या भाषणातून दिले. मात्र व्यासपीठावर अनुपस्थित असलेले बदलापूरचे वामन म्हात्रेंचा उल्लेख करीत पुढील सभेला त्यांच्या उपस्थितीसाठी स्पष्ट शब्दांत सूचना केल्या. तसेच गद्दारीचा टॅग वापरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर खरपूस टीका केली व आजी नातवाची गोष्ट सांगून राज्यातील घाणेरड्या राजकारणाला उपमा दिली. तर राज्यातील लाडकी बहीण योजनेवर देखील त्यांनी प्रकाश टाकला. मात्र लोकसभेतील ४०० पार अपेक्षा भंगावर त्यांनी सावध भाष्य केले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अतिउत्साही न राहता मतदारांपर्यंत पोहचण्याची वर्दी दिली आणि त्याच सक्रिय कार्यकर्त्यांना पुढे कमिटी देण्याचा सल्ला सुध्दा दिला. तर किसन कथोरेंच्या राजकीय प्रवासाचा पाढा वाचून त्यांच्या कामाचे कौतुक ही केले. 


Pramod Hindurao, NCP (AJ)

 किसन कथोरेंच्या या पहिल्याच महासभेला उपस्थित जनसमुदायासाठी आसनव्यवस्था अपुरी पडल्याचे दिसून आले. त्यामुळे विरोधी उमेदवारा समोरील कडवे आवाहन यानिमित्ताने सुस्पष्ट झाले असून ही विधानसभा निवडणूक त्यांना एवढी सोपी नसल्याचे बोलले जात आहे.



(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-किशोर गायकवाड, मुरबाड

वाचा...











Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments