![]() |
Subhash G. Pawar, Murbad |
Murbad Election : सुभाष पवारांच्या प्रवेशाने मुरबाड विधानसभेतील आघाडीत बिघाडी; एकीकडे बदलापूर शहाराध्यक्षांचा राजीनामा तर मुरबाडमध्ये मविआ अंतर्गत पोटदुखी हळूहळू चव्हाट्यावर?
-Kishor K. Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. २४) : (किशोर गायकवाड) ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उडी घेतलेल्या सुभाष पवार यांच्या प्रवेशापासून मुरबाड विधानसभेत महाविकास आघाडीतील पोटदुखी लागलीच चव्हाट्यावर येऊ लागली असून त्यामुळे प्रतिस्पर्धी बाकावरील भाजपा उमेदवाराच्या समोरील वातावरण आपसूकच प्रचारार्थ मोकळं होण्याची चिन्हे दिसत आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशानंतर सुभाष पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मविआ टीममध्ये हळूहळू चलबिचल वाढलेली दिसून येत आहे. पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशापासून अबसेंट असलेले स्वपक्षीय खा. सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (MP Balyamama) यांचेसह एकही जुना सक्रिय मविआ पदाधिकारी यावेळी उपस्थित दिसला नाही.
तर या प्रवेशानंतर बदलापूरचे शहराध्यक्ष तथा दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले इच्छुक उमेदवार शैलेश वडनेरे यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्याची पाहिलीच चिंतेची बातमी समोर आली. त्यातच मुरबाडचे नवनियुक्त शिवसेना (UBT) तालुका प्रमुख संतोष जाधव यांनीही सोशियल मीडियाच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेवर आक्षेप नोंदविला आहे. ज्या शिवसेनेतून निवडणूक लढवून उपाध्यक्ष पद भूषविले त्या पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा, कार्याचा साधा उल्लेख सुद्धा करता आला नसल्याची खंत व्यक्त व्यक्त केली आहे. तर, नक्की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची आघाडी आहे की मुरबाड विधानसभे पुरते शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची युती आहे, असा गंभीर आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेवर केला आहे.
त्यामुळे आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (UBT) पक्षाला मविआ उमेदवार सुभाष पवार कमी लेखत असल्याची अप्रत्यक्ष नाराजी त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलेली वाचायला मिळत आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी ही फोनद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. अर्थातच, या एकामागे एक घडत असलेल्या दुफळी घटनांमुळे सुभाष पवार यांचा मविआ अंतर्गत संघर्ष स्पष्ट झाला असून पवार यांच्या समोर आधी आपसात समेट घडवून आणण्याचे मोठे आवाहन उभे ठाकलेले पाहायला मिळत आहे.
-किशोर गायकवाड, मुरबाड
0 Comments