मुरबाडमध्ये फटाकेंच्या गोडावूनात स्फोट; एकाचा जागीच मृत्यू; जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल -Kishor K. Gaikwad


मुरबाडमध्ये फटाकेंच्या गोडावूनात स्फोट; 

एकाचा जागीच मृत्यू; जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

-Kishor K. Gaikwad


ठाणे/मुरबाड (दि. १४) : (किशोर गायकवाड) मुरबाडमधील कोलठण गावातील फटाकेंच्या एका गोडावूनमध्ये स्फोट झाल्याची झाल्याची घटना घडली असून या स्फोटामध्ये ४१ वर्षीय मालक मनीष जवार नारंग यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात तेथील एक हमाल देखील जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.



 तर फटाकेंच्या बॉक्सेसची उचल-ठेव करतांना हा स्फोट घडून आल्याचे प्राथमिक माहितीद्वारे समजले आहे. या स्फोटाची दाहकता इतकी भीषण होती की चक्क भिंतीला मोठं भगदाड पडून दरवाजाच्या मजबूत लोखंडी अँगलचे देखील तुकडे तुकडे झालेले पाहायला मिळाले. त्याचा चुरा त्याठिकाणी उभे असलेले टेम्पो चालक शंकर पालवे टेम्पो यांच्या चेहऱ्यावर पडून जखमा झाल्यात आहेत. याच स्फोटात मनीष यांच्या डोक्याचा भाग होत्याचा नव्हता झाल्याचे निदर्शनास आले. 



  तर या घटनेची माहिती मिळताच मुरबाडचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक कामत तसेच तहसिलदार अभिजित देशमुख घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून सदर घटनेचा स्थळ पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेच्या अनुषंगाने मुरबाड, शहापूर तालुक्यातील सर्व अनधिकृत फटाकेंच्या गोडावूनांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.


 -किशोर गायकवाड, मुरबाड





Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments