प्रतिक्षा संपली | वाचा, मुरबाड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम सविस्तर; यादी भाग, BLO संख्या, एकूण मतदार संख्या, २०१९ची मतदान आकडेवारी, नामनिर्देशन, माघार, मतदान, मोजणी ते निकाल... Kishor Gaikwad


प्रतिक्षा संपली | वाचा, मुरबाड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम सविस्तर; यादी भाग, BLO संख्या, एकूण मतदार संख्या, २०१९ची मतदान आकडेवारी, नामनिर्देशन, माघार, मतदान, मोजणी ते निकाल...

-Kishor K. Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. १७) : (किशोर गायकवाड) भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून राज्यातील निवडणूकांच्या अनुषंगाने मुरबाड विधानसभा क्षेत्रातील आदर्श आचारसंहिता संदर्भात तसेच निवडणुकीच्या बाबतीत ठळक मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली पवार तसेच मुरबाडचे तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित देशमुख यांच्या अख्यारीत आज तहसिलदार कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.


 यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी नियोजित मुरबाड विधानसभा निवडणूक संदर्भातील प्रमुख बाबींचा खुलासा केला.


 एकूण ५१८ यादी भाग तसेच केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संख्या असलेल्या मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मुरबाड, बदलापूर शहरी, कल्याण ग्रामीण व अंबरनाथ ग्रामीण मतदार संघात दि. ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार एकूण ४ लाख ५९ हजार २२७ इतकी मतदार नोंदणी आहे. यात २ लाख ३८ हजार ५९८ पुरुष, २ लाख २१ हजार ६१२ महिला व इतर १७ यांचा समावेश आहे. तर सन २०१९ च्या विधानसभेला ३ लाख ९७ हजार ८६९ इतकी नोंद असलेल्या मतदार आकडेवारी पैकी २ लाख ३२ हजार २०९ अर्थात ५८.३६ टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र या आकडेवारीमध्ये ६० हजार अधिकने वाढ झाली असून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी मुरबाडमधील प्रशासनाने कंबर कसलेली दिसून येत आहे.





 -किशोर गायकवाड, मुरबाड






Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments