कमळ Vs तुतारी : भाजपाच्या पहिल्या यादीत कथोरे अन् पवारांच्या हाती तुतारी; मात्र दोहोंच्या बॅकअप टीम विरुद्ध पक्षात? कशी असेल मुरबाड विधानसभेतील पुढील रणनीती? वाचा...
-Kishor K. Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. २१) : (किशोर गायकवाड) भाजपा पक्षाकडून काल जाहीर झालेल्या विधानसभा उमेदवारांच्या पहिल्या यादी मुरबाडमधून तिसऱ्यांदा किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली असून सुभाष पवार (Subhash Pawar) राष्ट्रवादीच्या मार्गावरील चर्चेला देखील पूर्णविराम मिळाले आहे. त्यामुळे यंदा मुरबाड विधानसभेत पुन्हा एकदा कथोरे विरुद्ध पवार सामना पाहायला मिळणार आहे.
![]() |
Subhas Pawar In Rashtrawadi (SP) |
मागील विधानसभेला ऐनवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांनी अज्ञातवासाची भूमिका घेतल्याने भाजपाचे किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांचा विजयी मार्ग मोकळा झाला होता. असे असताना राष्ट्रवादीच्या मतदानाचा आकडा त्यामानाने लक्षणीय ठरला होता. यावेळेस परिस्थिती मात्र वेगळी असल्याचा अंदाज वर्तविला जात असून भिवंडी लोकसभे (Bhiwandi Loksabha) पाठोपाठ मुरबाड विधानसभा (Murbad Vidhansabha) देखील मोठ्या चुरशीची होणार असल्याचे मतदारसंघातून बोलले जात आहे.
शिवाय, भिवंडीचे स्वपक्षीय माजी खासदार कपिल पाटील (Kapil Patil) आणि मुरबाडचे भाजपा उमेदवार किसन कथोरे यांचा वाद आता जवळपास जनमान्य झाला आहे. त्यातच लोकसभेतील फितुरीचा आरोप पुसण्यात अपयश आल्याने लागलीच विधानसभेत याचा रिटर्न गिफ्ट टाळण्यासाठी भयभीत कथोरेंनी सर्वप्रथम पक्षांतर्गत धोके बाजूला सारायला सुरुवात केली असून विशेष वैयक्तिक प्रयत्नांतून निवडणूक पूर्व नवीन जिल्हा अध्यक्षाचे भरभरून स्वागत केल्याची जोरदार चर्चा आहे.
भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी मुरबाड शहरात नुकताच झालेल्या भाजपा निष्ठवंत मेळाव्यात बदलापूरमधील राजकीय विवादाच्या मुद्द्याला आपसूकच हात घातला होता. यावेळी भाषणात बोलतांना त्यांनी दोनशे ते तीनशे गुंडांना बदलापूरच्या कार्यक्रमात आणून मला धक्काबुक्की केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, माझ्या अंगावर चालून आलेल्या माणसाला मी कधीच माफ केल नाही; जात दाखवायला लावली तर आम्ही मैदानात उतरू अशा चेतावणीखोर व्यक्तव्यातून मोहपे यांनी अप्रत्यक्ष कथोरे यांना इशारा दिल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभेत मोहपे यांच्या भूमिकेचा अंदाज बांधून सर्वप्रथम पक्ष पदापासून परावृत्त केल्याचा आरोप होत आहे. तर मोहपे हे कपिल पाटील गटातील प्रमुख लीडर असल्याने त्यांची भूमिका निश्चितपणे जगजाहीर म्हणावी लागेल.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे खा. सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे [MP Suresh (Balyamama) Mhatre] हे किसन कथोरे यांच्या मर्जीतील बॅकअप पॉईंट असल्याची गुप्त चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या बँकअप टीम विरुद्ध पक्षातून कशा पद्धतीने आपल्या मर्जीतील उमेदवारांना ताकद देतात? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. (क्रमशः...)
-किशोर गायकवाड, मुरबाड
2 Comments
Congratulations kishor
ReplyDeleteSavistaar news
Nice kishor
ReplyDelete