गौप्यस्फोट : आ. रुपेश म्हात्रेंचे बाळ्यामामा विरोधात काम करण्याचे आदेश; कोट्यवधींचा पॉकेट घेतल्याचा मा. तालुका प्रमुखाचा पत्रकार परिषदेतून आरोप..! Kishor Gaikwad


गौप्यस्फोट : आ. रुपेश म्हात्रेंचे बाळ्यामामा विरोधात काम करण्याचे आदेश; कोट्यवधींचा पॉकेट घेतल्याचा मा. तालुका प्रमुखाचा पत्रकार परिषदेतून आरोप..!


मुरबाडच्या  उबाठा  सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर


ठाणे/मुरबाड (किशोर गायकवाड) : (दि. ११) मुरबाडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुखपदी गुरुवारी नव्याने संतोष परशुराम जाधव यांची निवड करण्यात आली असून याबाबत पक्षाच्या नाराज गटाने शुक्रवारी पत्रकार परिषदेतून या निवडीला विरोध दर्शविला आहे. दरम्यान पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रुपेश म्हात्रे यांच्या बाबतीत मोठे गौप्यस्फोट करण्यात आले.

 

 ठाकरे सेनेचे माजी मुरबाड तालुका प्रमुख संतोष विशे व नवनियुक्त ता. प्र. संतोष जाधव यांच्यातील पक्षांतर्गत गटबाजी मागील काही दिवसांपूर्वी आयोजित एका जन आक्रोश मोर्चामुळे चर्चेत असतांना शुक्रवारी विशे टीमद्वारे आयोजित या पत्रकार परिषदेमुळे त्यास हवाला मिळाला आहे. त्यामुळे निवडणूक पूर्व मुरबाड तालुक्यातील उ. बा. ठा. शिवसेना पक्षातील अंतर्गत हेवेदावे आता सुस्पष्टपणे चव्हाट्यावर आले आहेत. याच कारणामुळे एकीकडे अध्यक्षपदाचा सेलिब्रेशन तर दुसरीकडे विरोधात पत्रकार परिषद, असे चित्र मुरबाडच्या ठाकरे गटात पाहायला मिळत आहे.

 

 तर येत्या काळात पक्षांतर्गत गटबाजीचा वाद आता अधिक पेट घेणार असल्याचे आज दिसून आले. नुकतीच मुरबाड तालुका प्रमुख पदी निवड झालेले संतोष जाधव  यांच्यावर संतोष विशे यांनी कडाडून जोरदार टीका केली.


 तर आ. रुपेश म्हात्रे यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात तसेच विचारात न घेता जाधव यांची तालुका प्रमुखपदी केलेली निवड अत्यंत चुकीची असून आम्हाला मान्य नसल्याचे विशे म्हणाले. तसेच उपजिल्हाप्रमुख मधुकर आप्पा घूडे यांनी देखील या निवडीला विरोध दर्शवित नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बाळा चौधरी, रमेश कुर्ले सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र यावेळी बोलतांना विशे यांनी आमदार म्हात्रे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले असून आ. रुपेश म्हात्रे व अनपेक्षित नवनियुक्त तालुका प्रमुख संतोष जाधव यांची भूमिका पक्ष विरोधी असल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र शिवसेनेतून शिंदे गट विभक्त झाले असून मी केवळ बाळासाहेब आणि उद्धव साहेबांचा कार्यकर्ता असल्याने पक्षाशी आजन्म एकनिष्ठ राहेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ही गटबाजी पुढे काय वळण घेते? याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे.

 -किशोर गायकवाड, मुरबाड


Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments