ACCIDENT : मृत तरुणांसहित माळशेज घाट रस्त्यावरील अपघाताचे फोटो सोशियल मीडियावर व्हायरल; अर्टिगा कार होत्याची नव्हती तर मृतांमध्ये तीन तरुणांचा समावेश
ठाणे/मुरबाड (दि. ५) : (किशोर गायकवाड) काल रात्रीच्या सुमारास माळशेज घाट रस्त्यावरील भोरांडे फाट्याजवळ भिषण अपघात झाल्याची माहिती व फोटो सोशियल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंमध्ये मृत तरुणांचा समावेश देखील दिसून आहे.
याबाबत व्हायरल माहिती वरून, काल मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट (Malshej Ghat) महामार्गावरील भोरांडे फाट्या जवळ भीषण अपघाताचे फोटो व्हाट्सएपद्वारे प्रसारित करण्यात आले आहेत. यात पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची अर्टिगा कार क्र. एमएच ०५ इए १९९३ ही अपघात ग्रस्त गाडी दिसून येत असून सोबत काही मृत तरुणांचे फोटो व ओळख पटविण्याबाबत माहिती आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीवरून, कल्याण दिशेकडून माळशेज घाट मार्गे जाणारी अर्टिगा कार महामार्गावरील भोरांडे गावाच्या हद्दीतील ब्रिजच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने झाडाला धडकून अपघात झाल्याचे समजले आहे. यात कल्याण तालुक्यातील चिंचपाडा येथील वैभव अशोक कुमावत, गोवेली रेवतीपाडा येथील बंटी उर्फ शिवाजी पुंडलिक घाडगे, अक्षय घाडगे हे जखमी तर गोवेली येथील प्रतीक चोरघे, अश्विन भोईर, नरेश मधुकर म्हात्रे अशी मयत अपघातग्रस्तांची नावे समोर आली असून जखमींना मुरबाड शहरातील रॉयल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती कळाली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस (Tokawade Police Station) पुढील तपास करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर मुरबाड दिशेने येणाऱ्या मुंबई येथील दुचाकी व अहमदनगर मार्गे जाणाऱ्या तारकपूर आगाराची बस यांचेत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सांताक्रूझच्या तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना पुन्हा याच मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे माळशेज माथ्यावर करमणूकीचा काच पूल उभरण्या ऐवजी माळशेज घाट महामार्ग सुरक्षित करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
0 Comments