कहानी में ट्विट्स : माझी लाडकी बहीण योजनेवर आ. कथोरेंचा दावा? कार्यकर्त्यांच्या बॅनर्सने शहरात संभ्रम... नेमकं सत्य काय..? -Kishor K. Gaikwadकहानी में ट्विट्स : माझी लाडकी बहीण योजनेवर आ. कथोरेंचा दावा? कार्यकर्त्यांच्या बॅनर्सने शहरात संभ्रम... नेमकं सत्य काय..?


-Kishor K. Gaikwad

ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) सद्या राज्यभर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' चर्चेचा विषय बनली असून योजनेची घोषणा झाल्यापासून पात्र महिला वर्ग कागदपत्रे सादरीकरणाच्या प्रक्रियेत व्यस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत. राज्यातील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (AP) यांच्या त्रिसूत्री सरकारने या योजनेची घोषणा केली आहे. मात्र असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये या योजनेबाबत एक नवीनच ट्विस्ट समोर आले आहे.


  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत Mukhyamatri Majhi Ladaki Baheen Yojana) काहीना काही बदल समोर येत असून नुकताच या योजनेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी संख्येत निश्चितपणे वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वय वर्षे २१ ते ६५ दरम्यानच्या वयोगटातील आधारकार्ड, बँक पासबुक, फोटो व हमीपत्रा समवेत पंधरा वर्षांपूर्वीचे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड आणि मतदान कार्ड धारक भगिनींना ऑनलाइन पध्दतीने फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑफलाइन फॉर्म जमा करण्यासाठी आपल्या परिसरातील अंगणवाडी केंद्रात तजवीज ठेवण्यात आली आहे.
विधानसभेच्या अंतिम पंचवार्षिक अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या योजनेची घोषणा केली आहे. असे असले तरी सदर योजनेचा मूळ हा मुरबाड विधानसभेत (Murbad Vidhansabha) असल्याचे नवीच समोर आले आहे. '...आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याला यश' अशा आशयाचे बॅनर मुरबाडमध्ये नाक्यावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे नवीन ट्विस्ट मुरबाडच्या मतदारांपुढे आलेले पाहायला मिळत असून याबाबत विरोधकांनी चांगलीच झोड उठवलेली दिसून येत आहे. तर आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांना वाहत्या पाण्यात हात धुवून घेण्याची जुनीच सवय असून विधानसभेच्या पूर्वार्धात मतपेरणीसाठी त्यांनी अशाप्रकारे डोकं लावल्याची टीका केली जात आहे.


  सबब, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अथवा अर्थमंत्री अजित पवार हेच सत्य काय ते सांगू शकतील. मात्र याप्रकरणी आमदार किसन कथोरे काही खुलासा करतील का? याकडे सर्वचे लक्ष लागले आहे.

 "आमदार किसन कथोरे यांना नेहमीच श्रेय घेण्याची सवय आहे. मुरबाडमध्ये कोणतेही विकास काम झाले की ते फक्त आमदार कथोरे यांच्या नावाने खपविले जात असते. एवढेच नव्हे तर मुरबाड विधानसभे बाहेरील कामांवर देखील ते स्वतःचा पेटंट लावत असतात. त्यांच्या याच सवयीमुळे खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी मुरबाडमधील भाषणात गाढवांच्या जुळ्याचे दिलेले उदाहरण मुरबाडची जनता विसरली नाही. मात्र याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे."  

 -रविंद्र चंदने, जिल्हाध्यक्ष - रिपाइं सेक्युलर, ठाणे

"लेक लाडली योजना अजून प्रत्यक्षात लागू झाली नाही. ही योजना केवळ येत्या विधानसभेसाठी भांडवल म्हणून आणली आहे. ही अंमलात येईपर्यंत विधानसभा येऊन ठेपेल आणि मतदारराजांचा अपमान केला जाईल. त्यामुळे जनता या सरकारला आणि त्यांच्या आमदारांना या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल. मात्र योजनेत काही अपहार होत असेल तर अर्जदार भगिनींनी ८९८३४४४६७८ या क्रमांकावर संपर्क साधावा." 

 -चेतनसिंह पवार, तालुकाध्यक्ष - काँग्रेस पक्ष,मुरबाड

 "योजना आमदार कथोरेंची असेल तर त्यांनी तसा लेखी पत्रव्यवहार जाहीर करावा. सदर योजना अद्याप वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे योजना फसल्यास त्याची जबाबदारी देखील कथोरे यांनी घेण्याची तयारी ठेवावी. उगाच प्रत्येक गोष्टींची हमी घेऊ नये. जनतेची चेष्टा करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा येत्या निवडणुकीत नक्कीच सुफडा साफ होईल." 

 -दीपक वाघचौडे, तालुकाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस (SP), मुरबाड


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...


Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments