मामा आ रहा हैं! बातमी पोहचली आणि उद्या खा. बाळ्यामामा मुरबाडच्या भेटीसाठी; समस्यांचे निवेदन आणण्याचे आवाहन... -Kishor Gaikwad


मामा आ रहा हैं! बातमी पोहचली आणि उद्या खा. बाळ्यामामा मुरबाडच्या भेटीसाठी; समस्यांचे निवेदन आणण्याचे आवाहन...

-Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. १९) : (किशोर गायकवाड) भिवंडी लोकसभेतून निवडून आलेले खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे [Suresh (Balyamama) Mhatre] हे उद्या मुरबाडमध्ये उपस्थित राहणार असून याबाबत मुरबाडच्या जनतेला पक्षाच्या पदाधिकारी यांचेकडून आवाहन करण्यात आले आहे.


लोकसभेत विजयाची माळ गळ्यात पडल्यापासून खा. बाळ्यामामा हे मुरबाडकरांना विसरले असल्याचा आरोप होत असून याबाबत शब्द मशालने (Shabd Mashal) वृत्त देखील प्रसारित केले होते. तदनुसार उद्या (दि. २०) सकाळी ११ वाजता शहरातील म्हसा रोड येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृहात खा. बाळ्यामामा मुरबाडकरांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार असून मुरबाडच्या जनतेने आपल्या समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिपक वाघचौडे यांनी समाज माध्यमांद्वारे केले आहे.



 यावेळी खासदार बाळ्यामामा हे मविआचा (MVA) घटकपक्ष असलेल्या श्यामदादा गायकवाड (Shyamdada Gaikwad) यांच्या रिपाइं सेक्युलर पार्टीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने यांची भेट घेऊन कल्याण - मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील (NH 61) प्रवासी समस्येवर चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे समजले आहेत. तर एका दीर्घ काळानंतर बाळ्यामामा मुरबाडकरांच्या भेटीसाठी येत असल्याने जनतेमध्ये तसेच मविआ कार्यकर्ते यांच्यात उत्सुकतेचे वातावरण आहे.

 

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...













Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments