फुकणेगिरी : मुरबाडची रेल्वे आणि माळशेजात काचेचा पूल, दोघेही मावस भाऊ कागदा बाहेर यायचं नाव घेत नाही? लोकसभा आटपून विधानसभा आली पण रेल्वे/काचपूल आले नाही; दोन भागांत वस्तुस्थितीवरील भाष्य...(भाग-१) Kishor K Gaikwad



फुकणेगिरी : मुरबाडची रेल्वे आणि माळशेजात काचेचा पूल, दोघेही मावस भाऊ कागदा बाहेर यायचं नाव घेत नाही? लोकसभा आटपून विधानसभा आली पण रेल्वे/काचपूल आले नाही; दोन भागांत वस्तुस्थितीवरील भाष्य...(भाग-१)


Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. २३) : (किशोर गायकवाड) गेल्या दशकभरापासून मुरबाडच्या राजकारणाचा केंद्र ठरविलेल्या रेल्वे प्रकल्प आणि त्याचा मावसभाऊ म्हणून अकस्मात उदयास आणलेला माळशेज (Malshej) भाळी काचेचा पूल; यांच्या गवगव्याचे वस्तुनिष्ठ सत्य आता मुरबाडी जनतेच्या समोर येत चालले आहे.


 भौगोलिक दृष्ट्या विस्तृत आणि समृद्ध मानला जाणारा मुरबाड तालुका (Murbad Taluka) गेल्या काही वर्षांपासून राजकीय गराड्यात कुचेष्ठेचा भाग बनल्याचे अनुभवात पडत आहे. मुंबईपासून संलग्न अंतरावर असलेला मुरबाड तालुका (Murbad Taluka) आजतागायत दळणवळणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित भासत आहे. निम्म्याहून अधिक बंद एमआयडीसी (MIDC) व असुरक्षित तथा जीर्ण ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे वगळता एखादा कृत्रिम प्रकल्प देखील मुरबाडमध्ये सांगता येणार नाही. या खेरीज शैक्षणिक क्षेत्रातील अपेक्षित एखादं भव्य मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज अथवा आयटी हब यांसाठी किमान प्रयत्न तरी व्हावेत; याबाबत मुरबाडच्या राजकारण्यांना हालचाली करण्यात स्वारस्य वाटत नाही; हे नवलच! आजही मुरबाडमधून खूप मोठा चाकरमानी व विद्यार्थी वर्ग नोकरी तसेच शिक्षणासाठी मुरबाडच्या बाहेर स्थलांतर करीत असतो, या अपयशाला जबाबदार कोण?


  त्यात इथल्या आयात राजकारण्यांनी चांगलीच मुरबाडकरांची थट्टा चालवली आहे. रेल्वेच्या तीव्र प्रतिक्षेत पूर्ण एक दशक खर्ची केलेल्या मुरबाडवासीयांच्या भोळेपणाचा आधार घेत भाजपा आमदार यांनी पुन्हा काचेच्या पुलाचा (Glass Walkway in Murbad Malshej Ghat) स्वप्न भाबड्या मुरबाडकरांच्या समोर आणून ठेवला. रेल्वेच्या स्वप्नभंगातून पूर्णपणे बाहेर न पडलेल्या मुरबाडच्या आशावादी जनतेला सातत्याने काचेच्या पुलाच्या मृगजळाला भाळण्याचे प्रयत्न सुरूच आहे. माजी भाजपा खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी रेल्वे मुद्द्यावर भर देत दोन टर्म पूर्ण केल्या. दरम्यान त्यांनी कल्याण - मुरबाड रेल्वे प्रकल्पाला (Kalyan Murbad Railway Project) किमान केंद्रीय अर्थसंकल्पात १० कोटी ३६ लाखांचा वाटा देऊन कागदावर चि-टिकविण्यात तरी यश मिळविले. हाच पायंडा पुढे हाकत मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे (MLA Kisan Kathore) यांनी माळशेजी काचेच्या पूलाचा मोह समोर करीत येत्या मुरबाड असेंम्बलीमध्ये हट्रिक प्लसची तयारी केली आहे. राज्यात द्वितीय क्रमांकांची मते प्राप्त आमदार कथोरेंना निवडणूक पूर्व विजयी घोषित करण्यात आले आहे. किंबहुना, मुरबाड विधानसभेच्या मतदारांपुढे सक्षम पर्याय देखील नसल्याने किसन कथोरे यांचा विजयाचा मार्ग ही खडतर म्हणता येणार नाही. (क्रमशः..)


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...

Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

2 Comments

  1. आपण खूप चांगले मुद्दे उचलून धरत आहेत. नक्कीच यश येईल. बस भाडेवाढ आपण कमी करून दिली आहे त्यामुळे हे मुद्दे पण success होतील.

    ReplyDelete