Pendhari Dam
खटक्यावर बोट : पेंढरी धरण श्रेयवादाच्या भोवऱ्यात; क्रेडिटसाठी आमदार-माजी खासदार दोघांच्या बातम्या सोशिअल मीडियावर, मात्र मंजुरी आधीच कामाला झाली होती सुरुवात, कोण फोडेल नारळ? पराभवाचा ठपका, त्यात विधानसभा जड जाईल? वाचा विस्तृत...
Kishor K. Gaikwad
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुक्यातील पेंढरी गावच्या धारणाचे (Pendhari Dam) काम पूर्ण क्षमतेने सुरू होण्या आधीच श्रेयवादाच्या भोवऱ्यात सापडले असून याबाबत पुन्हा भाजपा (BJP) आमदार किसन कथोरे व भारत सरकारचे माजी मंत्री कपिल पाटील यांच्यात नव्याने श्रेयवादाची लढाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे..
दि. १२ जुलै रोजीचे शासन निर्णय पत्र |
एकीकडे 'मुरबाड तालुक्यातील पेंढरी धरणाला अखेर मान्यता मिळाली असून मुरबाड विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना यश' अशा आशयाच्या बातम्या आणि पोस्ट सामाजिक प्रसारमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले जात असल्याचे देखील त्यात नमूद आहे. तर दुसरीकडे 'पेंढरी धरणाच्या कामाला सुरुवात, माजी पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश' अशा बातम्या माजी खासदार कपिल पाटील (Ex. MP Kapil Patil) समर्थकांकडून व्हायरल केल्या जात आहे. त्यामुळे मुरबाडकरांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी म्हसा येथे अशाच एका विकास कामाचा आमदार आणि तत्कालीन खासदार यांनी दुबार उद्घाटन केला होता. त्यामुळे मुरबाडमध्ये विकास कामांवरील श्रेयवाद हे कु-संस्कार जुनेच आहेत. तर पाडाले धरणाच्या प्रलंबित मोबदल्याची प्रक्रिया जातीने लक्ष घालून मार्गी लावली असल्याचे एका पत्रकार परिषदेत माजी खासदार कपिल पाटील यांनी सांगितले होते. मात्र सर्व बाबींमध्ये आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांची समर्थक मंडळी अपरोक्ष भूमिकेत दिसत आहे.
मान्यता पत्रपूर्वी काम सुरू असतांनाचे पेंढरी डॅम फोटो |
यातून आमदार-माजी खासदार वाद शमन्याचा नाव घेत नसल्याचे समोर आले असून भिवंडी लोकसभेला भाजपा खासदार पराजित झाल्याचा ठपका असलेल्या आमदार कथोरेंना येती विधानसभा जड जाईल का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मात्र पेंढरी धरणाचे काम कोणीही करा, श्रेय देखील कोणीही घ्या, पण आम्हाला धरण बांधून द्या, अशा भूमिकेत पेंढरी ग्रामस्थ शेतकरी दिसत आहेत.
0 Comments