मुरबाडमधील क्रोधजनक घटना : रस्त्या अभावी गरोदर आदिम महिलेला बांबू-चादरीच्या ऍम्ब्युलन्समधून उपचारार्थ दाखल; रस्त्यासाठी पराजित खासदाराचे साकडे, मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी निद्रिस्त? -Kishor Gaikwad


मुरबाडमधील क्रोधजनक घटना : रस्त्या अभावी गरोदर आदिम महिलेला बांबू-चादरीच्या ऍम्ब्युलन्समधून उपचारार्थ दाखल; रस्त्यासाठी पराजित खासदाराचे साकडे, मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी निद्रिस्त?

Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. २८) : (किशोर गायकवाड) देशातील प्रथम कॅशलेस गाव म्हणून भोबाटा केलेल्या मुरबाड तालुक्यातील धसई गावाच्या प्रवेशस्थाना पासून अगदी जवळ असणाऱ्या ओजिवले येथील कातकरी वाडीतील आदिम समाजाच्या महिलेची प्रसूती व्यथा सद्या राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.



सुमारे पन्नास पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या मुरबाड तालुक्यातील धसई नजीकच्या ओजिवले कातकरी वाडीपर्यंत येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला चक्क बांबूला चादर बांधून तयार करण्यात आलेल्या ऍम्ब्युलन्समधून खांद्यावरून प्रसूतीसाठी नेण्यात आले. हा मुद्दा राज्यभर गाजत असताना विद्यमान लोकप्रतिनिधी निद्रिस्त असल्याच्या टीका होत आहेत. तर याबाबत विशेष म्हणजे नुकताच लोकसभा पराजित माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन ओजीवले कातकरी वाडीपर्यंत रस्त्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतून अथवा जिल्हा नियोजन विकास निधीतून सदर रस्त्याच्या कामास प्राधान्याने प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची विनंती सदर पत्रात नमूद आहे.



राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) वास्तव्यात असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात घडलेली ही घटना आजही आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याची साक्ष देत आहे. असे असले तरी सदरची घटना मुरबाडमध्ये पहिलीच म्हणता येणार नाही. यापूर्वी ही झोळीतून आदिवासी गरोदर भगिनींना उपचारासाठी संघर्ष करावा लागल्याच्या बातम्या मुरबाडच्या वृत्तपत्रांमध्ये नोंद आहे. 



  मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकही खड्डा नाही, असल्यास तिथं माझा मतदारसंघ संपल्याचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे सातत्याने जाहीर करीत असतात. मात्र, मुळात या वाडीला रस्ताच माहीत नसल्याने त्यांचे हे अतिशयोक्ती दावे फोल ठरल्याचे म्हणावे लागेल. 



 भौगोलिक दृष्ट्या मुरबाड हे मुंबई संलग्न मानले जाते. विविध जातीधर्माचे लोक येथे पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. परंतु, प्रत्येक वेळी सुविधा अधिकारापासून फक्त आदीवासी, मागासवर्गीयांनाच उपेक्षित का राहावे लागते? याबाबत खऱ्यार्थी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे.

 

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...




Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments