Muharram : पोलिसांच्या कडक बंदोबस्तांत मुरबाडमध्ये ताजिया मिरवणूक
-Kishor Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. १८) : (किशोर गायकवाड) मुरबाडमध्ये दरवर्षी प्रमाणे मोहरम आणि ताजिया मिरवणूक मोठ्या श्रद्धेने मुस्लिम बांधवांकडून आयोजित केली जाते.
शहीदांच्या सर्वोच्च बलिदानाला उजाळा देण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने मुस्लिम बांधव दरवर्षी मुरबाड मुस्लिम मोहल्लापासून संपूर्ण बाजारपेठेत भक्तिभावे धर्म गीते पठण करत मिरवणूक काढतात. याप्रसंगी विविध धर्माचे लोक या ताजियाचे दर्शन घेतात आणि यात सहभागी होत असततात.
सामाजिक भावनेतून मुरबाड शाळकरी विद्यार्थी व तरुणांनी यावेळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मिरवणुकीला पाणी वाटप केले. त्यामुळे मुरबाडमध्ये ताजिया सण हा ऐक्याचे प्रतीक मानले जाते. तर या मिरवणुकीला गालबोट लागू नये म्हणून मुरबाड पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर प्रमोद बाबर यांचे समवेत पोलिसी फौजफाटा तैनात होता.
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
-Kishor K Gaikwad
वाचा...
0 Comments