
NH 61

अन्यथा हायवेवर आंदोलन करू : कल्याण-मुरबाड रा. महामार्गाच्या वाढत्या पसाऱ्यावर रिपाइंचा संताप; संथ कामाविरोधात आंदोलनाचा इशारा...
Kishor K. Gaikwad
मुरबाड (दि. १७) : (किशोर गायकवाड) मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या संथरित्या सुरू असलेल्या चौपदरीकरण कामामुळे ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या दयनीय अवस्थेला प्रवाशांसह सामान्य नागरिक देखील बेजार झाले असून याविरोधात रिपाइं सेक्युलर पक्षाने विविध मागण्यांचे पत्र दिले आहे.
महामार्ग (NH 61) खोदून ठेऊन दोन्ही बाजूने केवळ गटाराची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाने प्रवास करावा लागतो. खाजगी चारचाकी - दुचाकी धारकांना रात्री अपरात्री प्रवास करताना पावसात रस्त्यावरील भरावाचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत ज्या अंतरापर्यंत रस्ता उखडून ठेवला आहे, त्या गावापर्यंत रस्ता पूर्ण केल्याशिवाय पुढील रस्ता खोदून ठेवू नये, आज पर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघाताची जबाबदारी संबंधीत ठेकेदारानी घेऊन अपघात पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, मुरबाड तालुक्याच्या हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला दिल्या शिवाय काम सुरू करू नये, मुरबाड शहरालगत (Murbad City) रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायीकांना दिवाळी पर्यंत उठवू नये अशा विविध मागण्यांचे निवेदन आंबेडकरी नेते श्यामदादा गायकवाड (Shyamdada Gaikwad) यांच्या रिपाइं सेक्युलर (RPIS) पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते देण्यात आले असून याप्रकरणी गांभीर्यपूर्वक निर्णय न घेतल्यास ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. तर प्रवासी व चालक यांच्या व्यथा महामार्ग प्रशासनाच्या दरबारी मांडण्यात आल्याने पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments