सोहळ्यातून सन्मान : आरपीआयए तालुकाध्यक्ष पदी नवीन चेहरा, पोलिस पाटीलांना जॅकेट तर वकिलांना मानपत्र, पहा व्हिडिओ; जेष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्यात आ. कथोरे मुख्य मार्गदर्शनातून काय म्हणाले? -Kishor Gaikwad


सोहळ्यातून सन्मान : आरपीआयए तालुकाध्यक्ष पदी नवीन चेहरा, पोलिस पाटीलांना जॅकेट तर वकिलांना मानपत्र, पहा व्हिडिओ; जेष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्यात आ. कथोरे मुख्य मार्गदर्शनातून काय म्हणाले?

Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. ३१) : रिपाइं (आ) पक्षाच्या मुरबाड कार्यकारिणी तर्फे बुधवारी शहरातील एमआयडीसी हॉलमध्ये जेष्ठ नागरिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर रिपाइंएचे राष्ट्रीय सचिव सुरेशदादा बारसिंग, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराट्र प्रदेश उपाध्यक्ष महेबूब भाई पैठणकर, उद्घाटक आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर विराजमान होते.


तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री तथा रिपाई अध्यक्ष ना. डॉ. रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्या आदेशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा रिपाइंएचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांनी सांगितले. या सोहळ्याला रिपाइं (आ) च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत भाजपा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती.


मायदेशी परतलेल्या डॉ. प्रियंका संजय बोरगे यांचा सन्मान

 याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मुख्य मान्यवर आमदार किसन कथोरे यांचे भाषण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले असून या उपक्रमाची संकल्पना अंमलात आणणारे आरपीआयए पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांचे आपल्या भाषणातून त्यांनी भरभरून कौतुक केले. परिणामी, दुसरीकडे भाजपा पदाधिकारी यांना कार्यक्रमाचा हेवा वाटल्याची चर्चा सुरू झाली असून आ. कथोरे आपल्या कार्यकर्ते मंडळींना कोट्यवधी रुपयांच्या कामांचे शिफारस पत्र देऊन देखील त्यांच्याकडून असे सामाजिक उपक्रमांची संकल्पना राबविली जात नाही, अशी खंतात्मक टिप्पणी गुप्तपणे चर्चिली जात आहे.

तालुका अध्यक्ष पदी निवड...

 या सोहळ्याचे औचित्य साधून रिपाइं(आ) चे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंगे यांच्या हस्ते मुरबाड तालुका युवक अध्यक्ष पदी धनंजय थोरात यांची निवड करण्यात आली असून येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये थोरात यांच्यावर महायुतीच्या उमेदवाराला तालुक्यातून भरीव मतदान मिळवून देण्याचे आव्हान सोपविण्यात आले आहे.


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...

















Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा



(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments